Home पुणे जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार (मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस)

जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार (मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस)

204

आशाताई बच्छाव

1001494220.jpg

जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार (मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस)
(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील).
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)’ कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी मा. देवेंद्रजी यांच्या समवेत उपस्थित राहिलो. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, देशात ज्या काळात परकीय आक्रमणांचा मारा वाढला होता आणि भागवत धर्म संकटात सापडला होता, त्या कठीण काळात भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वारकरी संप्रदायाने केले. म्हणूनच इतकी आक्रमणे झाल्यानंतरही आपला धर्म, संस्कृती आणि विचार कोणीही संपवू शकले नाहीत. वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर यांनी रचला आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी त्यावर कळस चढवला. वारकरी संप्रदायाने जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे काम केले.

आज महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य ठरण्यामागे वारकरी संप्रदायाने रुजवलेली संस्कृती आणि अध्यात्मिक परंपरा आहे. जग हे मान्य करत आहे की, भौतिक श्रीमंती ही काही काळ टिकते, पण त्यातून शाश्वत सुख, शांती मिळतेच असे नाही. भारताचे मानसिक स्वास्थ्य आजही टिकून आहे कारण येथे संत परंपरेचे वैभव आहे. प्रत्येक गावात होणारा सप्ताह, भागवत धर्माचा सुविचार आणि काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरणाचे काम केले जाते. भौतिक प्रगती कितीही झाली, तरी अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती शक्य नाही हे सनातन धर्माने हजारो वर्षांपूर्वी ओळखले होते. म्हणूनच नामस्मरणासारख्या परंपरा निर्माण झाल्या. हीच विचारांची श्रीमंती आपल्या देशाला खऱ्या अर्थाने जगातील सर्वात समृद्ध देश बनवते, असे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यावेळी म्हणाले.

मा. देवेंद्रजींनी यावेळी मंदिर समितीच्या ४५० एकर जागेत ₹७०१ कोटींच्या निधीतून ‘ज्ञानपीठ’ उभारण्याची घोषणा केली. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विकास आराखडा सर्व मंजुरीसह केंद्राकडे पाठवला असून, या माध्यमातून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच परमपूज्य ह.भ.प. शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर यांना पद्म पुरस्कार देण्याची शिफारस राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे केली जाणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

यावेळी माझ्यासह आ. उमाताई खापरे यांच्यासह श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख, विश्वस्त आणि वारकरी उपस्थित होते.

Previous articleमातोश्री लक्ष्मीबाई रखमाजी राऊत पाटील…. (मातृदिनानिमित काही आठवणीतलं)
Next articleहभप गुरुवर्य श्री.सोनुने गुरुजी ‘ अमृतजीवनाचा अमृतमहोत्सव ‘ अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.