Home जालना हभप गुरुवर्य श्री.सोनुने गुरुजी ‘ अमृतजीवनाचा अमृतमहोत्सव ‘ अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्साहात...

हभप गुरुवर्य श्री.सोनुने गुरुजी ‘ अमृतजीवनाचा अमृतमहोत्सव ‘ अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ

124

आशाताई बच्छाव

1001494277.jpg

हभप गुरुवर्य श्री.सोनुने गुरुजी ‘ अमृतजीवनाचा अमृतमहोत्सव ‘

अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

हभप गुरुवर्य श्री.सोनुने गुरुजी यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचा शनिवारी ( ता.१०) उत्साहात प्रारंभ झाला.काकडा भजनासह नामजप आणि जगतगुरु तुकोबाराय जीवन चरित्र कथांचे हभप झोलकर महाराज यांच्या रसाळ वाणीतून निरुपणाने वारकरी धर्मसंकीर्तन सोहळ्यास प्रारंभ झाला..

जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेडा येथील
श्री गौरीशंकर गोसेवा आश्रम श्री क्षेत्र येथे ‘ अमृतजीवनाचा अमृतमहोत्सव ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार वैशाख शुध्द १३ दिनांक १० मे रोजी प्रारंभ झाला. सकाळी ४ ते ६ काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, नाम जप, गाथा भजन,श्रीसंत तुकोबाराय जीवन चरित्र कथा,प्रवचन, हरिपाठ, हरिकिर्तन असा दिनक्रमाने अखंड हरिनाम सप्ताहात वारकऱ्यांचा उत्साह दिसून आला.अखंड हरिनाम सोहळ्यात हभप प्रभाकर महाराज झोलकर यांचे ‘संत तुकाराम महाराज जीवन” चरित्र कथा निरुपणाने प्रारंभ झाला.कथा मांडताना झोलकर महाराज म्हणाले,की
मानवी जीवनात सद्गुरू सेवा मिळाल्या शिवाय उत्तीर्ण होवू शकत नाही. देवाला सुद्धा भक्ताचे साहाय्य करावे लागते.त्या शिवाय देवाला समाधान मिळत नाही. धन्य दिवस आजि झाला सोनियाचा. संतांचे चरित्र म्हणजे साधकाला एक पर्वणी असते. भगवंताला आपल्या चरित्र पेक्षा संत चरित्र फार आवडते. ह्या पृथ्वी तलावर साधूंचा दुष्काळ कधी पडला नाही. मी सर्वत्र असताना मला पाहणारे डोळे मात्र नाही.सर्व संतांमध्ये सर्व श्रेष्ठ जगतगुरु तुकोबारायांचे जीवन चरित्र असल्याचे हभप झोलकर महाराज यांनी सांगितले.
तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नामयाचा प्रखर बोलणारे तुम्हाला सापडणार नाही. नामच श्रेष्ठ आहे चरित्र दिव्य आहे. प्रल्हाद उद्धव नामदेव तुकाराम. तुकोबाराय यांचा जीवन क्रम असल्याचे झोलकर महाराज यांनी सांगितले.
प्रपंचाचे जीवन जगून वैकुंठ गमन फक्त तुकोबारायांचे देह जडत्व नाम साधना काय करू शकत नाही हा अनुभव जगाला सांगितला. एक निष्ठ नाम भक्ती. ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट’ या अभंगातील भावार्थ झोलकर महाराज यांनी उलगडून दाखविला. हभप गुरुवर्य श्री.सोनुने गुरुजी अमृतमहोत्सव सोहळ्यास भगवान महाराज गायकवाड,
वसंता चव्हाण,
कौतिकराव चव्हाण ,
गिना महाराज गाडेकर,
अंबादास महाराज भालके,
रामचंद्र पाटील गोरे ,हरि सोनुने,भाऊराव महाराज भालके,
शिवाजी महाराज चव्हाण,दिनकर मोरे, अनिल देव्हडे,विठ्ठल चव्हाण ,
विठ्ठल खेडेकर,अनिल म्हस्के यांच्यासह संयोजन समिती पदाधिकारी,
वारकऱ्यांची
उपस्थिती होती.

Previous articleजगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार (मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस)
Next articleटेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.