Home मुंबई सॅमसंगचे Galaxy सिरीजचे ३ नवे फोन लाँच 🛑

सॅमसंगचे Galaxy सिरीजचे ३ नवे फोन लाँच 🛑

152
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 सॅमसंगचे Galaxy सिरीजचे ३ नवे फोन लाँच 🛑
✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, २१ मार्च : ⭕ सॅमसंगने आपल्या Galaxy A सिरीज अंतर्गत ३ नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Samsung Galaxy A52, Galaxy A52 5G आणि Galaxy A72 लाँच झालेले आहेत. Galaxy A52 5G मध्ये 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. तर बाकी २ फोनमध्ये 90Hz चा डिस्प्ले आहे. Galaxy A52 ३० हजार २०० रूपये, Galaxy A52 5G ३७ हजार १०० रूपये, Galaxy A72 ३८ हजार ८०० रूपये.

हे तिन्ही फोन ऑसम ब्लॅक, ऑसम ब्लू, ऑसम वॉयलेट, ऑसम व्हाईट या रंगांमध्ये आहेत. या फोनमध्ये अँड्रॉईडचं ११वं व्हर्जन आहे. यामध्ये 8GB रॅम आहे. याशिवाय कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं, तर 64MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 5MP डेप्थ सेंसर आणि 5MP मायक्रो कॅमेरा आहे. Samsung Galaxy A52 5G चीही हीच वैशिष्ट्य आहेत.

Galaxy A72 ची वैशिष्ट्य अँड्रॉईडचं ११वं व्हर्जन आहे. 8GB रॅमसह ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 5MP मायक्रो कॅमेरा आणि 3X ऑप्टीकल झूम सपोर्ट करणारा कॅमेरा आहे. याशिवाय 8MP टेलीफोटो कॅमेरासुद्धा आहे.⭕

Previous articleडीआरडीओत अप्रेंटिस भरती 🛑
Next articleस्वस्त डेटा प्लान्स Jio, Airtel, Vi आणि BSNL 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here