Home मुंबई डीआरडीओत अप्रेंटिस भरती 🛑

डीआरडीओत अप्रेंटिस भरती 🛑

242
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 डीआरडीओत अप्रेंटिस भरती 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 21 मार्च : ⭕ डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (Defence Research & Development Organization, DRDO) ने आयटीआय अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत डीआरडीओ एकूण ३० पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यात फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट बुक बाइंडर सहित अन्य पदांचा समावेश आहे. या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च आहे.

➡️ टर्नर- ०६

➡️ मशीनिस्ट- ०७

➡️ वेल्डर- ०२

➡️ इलेक्ट्रीशियन- ०१

➡️ इलेक्ट्रॉनिक्स- ०१

➡️ बुक बाइंडर- ०१

➡️ कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट- ०७

🖥️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

डीआरडीओने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणारे इच्छुक आणि योग्य उमेदवार डीआरडीओ जॉब नोटिफिकेशन २०२१ साठी ३१ मार्च २०२१ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. उमेवारांना दहावीची मार्कशीट, आयटीआय प्रमाणपत्रासह अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची स्कॅन केलेल्या छायाप्रतींसह अर्ज करायचे आहेत. उमेदवारांना admin@dmrl.drdo.in या ईमेल आयडीवर मेल करायचा आहे. कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहाते, ते विषयात सुस्पष्टपणे नमूद करायचे आहे.

उदाहरणार्थ, फिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अप्रेंटिससाठी अर्ज करायचा आसेल तर मेलच्या सब्जेक्ट लाइन मध्ये अप्रेंटिस भरतीअंतर्गत फिटर पदासाठी अर्ज असं नमूद करावं लागेल. याव्यतिरिक्त उम्मीदवारांना हा सल्ला दिला जातो की ते आपला ईमेल अधूनमधून नियमितपणे तपासावा. अर्जाशिवाय जमा केलेले ईमेल स्वीकारले जाणार नाहीत.⭕

Previous articleकांदा दरात घसरण व्यापारी तुपाशी शेतकरी उपाशी
Next articleसॅमसंगचे Galaxy सिरीजचे ३ नवे फोन लाँच 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here