Home माझं गाव माझं गा-हाणं कांदा दरात घसरण व्यापारी तुपाशी शेतकरी उपाशी

कांदा दरात घसरण व्यापारी तुपाशी शेतकरी उपाशी

88
0

राजेंद्र पाटील राऊत

कांदा दरात घसरण व्यापारी तुपाशी शेतकरी उपाशी
लखमापूर,( प्रतिनिधी दावल पगारे युवा मराठा न्युज नेटवर्क)
सलग अवकाळी पाऊस गारपीट यांने शेतकरी पुर्ण हौराण झाला असताना थोडी उरली सुरली आशा कांदयावर होती मात्र अचानक कांदा भाव कोसळल्याने शेतकरी हवालदील झाला आहे वीस हजार रुपये पायली ने घेतलेल बियाणे लागवड मजुरी खाद्य याचा खर्च पाहाता साधारण चाळीस हजार रुपये ऐकरी खर्च
मध्ये अचानक भाव कोसळणे त्यामुळे काही शेतकरी उभ्या पिकात मेंढ्या चारुण देतं आहे या कारणांमुळे शेती व्यवसाय पुर्ण धोक्यात आला आहे जगाचा पोशिंदा जर उद्ध्वस्त होत आहे

आज जे कांदा दर दाखविले जातात 1200/1300 रू कि साफ चुकीचे आहे
कारण मार्केट मध्ये शंभर ट्रॅक्टर मधून ऐखादे ट्रॅक्टर वरील प्रमाणे विक्री होते मात्र बाकि 700/800
च्या पुढे कांदा घेतला जात नाही
त्यामुळे व्यापारी व सरकार या़चं संगणमत आसल्याची चर्चा शेतकरी वर्गात उमट आहे
कमवणारा उपाशी व्यापारी मात्र तुपाशी अशीच अवस्था झाली आहे
त्यामुळे कांद्याला किमान दोन हजार रुपये क्विंटल प्रमाणे हमी भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गात होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here