Home माझं गाव माझं गा-हाणं लॉकडाउन टाळण्यासाठी जनतेने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषीमंत्री...

लॉकडाउन टाळण्यासाठी जनतेने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय

122
0

राजेंद्र पाटील राऊत

लॉकडाउन टाळण्यासाठी जनतेने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे;

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय

मालेगांव,(सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                  नाशिक जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेवून कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच लॉकडाउन टाळण्यासाठी जनतेने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे संयुक्त आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोविड आढावा बैठकीत केले आहे.

▪️ “जिल्ह्यात वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येते 15 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे” असे आवाहन कृषीमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले.

▪️जिल्ह्यात सध्या 10 हजार 851 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 80 टक्के रुग्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रात असून 18 टक्के रुग्ण ग्रामीण भागात आहेत तर मालेगावमध्ये 716 रुग्ण आहेत. यातील साधारण 90 टक्के रुग्ण गृहविलगीकरणात असून या रुग्णांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.

▪️कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा, रेमडिसिव्हर, व्हेंटीलेशन बेड आदी पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयात 20 किलोलिटर ऑक्सिजन टँक रविवारपासून कार्यान्वित होणार आहे.

▪️ट्रेसिंग वाढविण्यात आले असून त्यासाठी 3050 वरून 8000 पेक्षा अधिक तपासण्या करण्यात येत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सर्व लॅब मिळून साधारण 21000 नमुने तपासणीची क्षमता तयार करण्यात आली आहे.

Previous articleमौजे बाराहाळी व मुक्रामाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी वीज जोडणी पूर्ववत करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.
Next articleकांदा दरात घसरण व्यापारी तुपाशी शेतकरी उपाशी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here