Home नांदेड मौजे बाराहाळी व मुक्रामाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी वीज जोडणी पूर्ववत करा, स्वाभिमानी शेतकरी...

मौजे बाराहाळी व मुक्रामाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी वीज जोडणी पूर्ववत करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.

126
0

राजेंद्र पाटील राऊत

मौजे बाराहाळी व मुक्रामाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी वीज जोडणी पूर्ववत करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुक्रामाबाद व बाऱ्हाळी परिसरातील शेतकऱ्यांची लाईट कट करणे बंद करा,शेतकऱ्यांची कट केलेली लाईट जोडून द्या,घराची लाईट कट करणे बंद करा.गावच्या पाणीपुरवठ्याची लाईट जोडून द्या,या मागण्यांचे निवेदन मुक्रमाबाद पोलिस स्टेशन येथे मुक्रमाबाद चे शाखाअभियंता राऊत व बाऱ्हाळी शाखा अभियंता जाधव यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
मुक्रमाबाद पोलिस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या मध्यस्तीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व लाईट ऑफिसचे शाखाअभियंता यांच्यात चर्चा करून,मागण्यामधील शेतकऱ्यांची लाईट कट करण्याचे थांबवणे,लाईट बिल वसुली करतांना सवलत व मुदत देणे या मागण्या मुक्रमाबाद व बाऱ्हाळीचे शाखाअभियंता यांनी मान्य केल्याने रास्तारोको मागे घेण्यात आला.
नांदेडमध्ये कोरोना वाढत असल्याने जिल्हाधिकारी साहेबांनी संचारबंदी लागू केली आहे.संचारबंदीमध्ये रास्तारोको न होता,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मुक्रमाबाद- व बाऱ्हाळी परिसरातील मागण्या लाईट ऑफिसकडून मान्य झाल्याने मुक्रमाबाद बस स्टँड येथे होणारा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
मुक्रमाबाद व बाऱ्हाळी परिसरातील शेतकऱ्यांची लाईट कट केली जाणार नाही.शेतकऱ्यांची लाईट कट करण्यात आली तर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क करावा.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवीण वाकडे,शंकर आतनुरे,बालाजी पाटील माळेगावे,नंदकुमार खंकरे,हरिदास पाटील,ज्ञानेश्वर येरपेवार,मोहंमद शाकिर पटेल,राजेश गवले,माधव ज्ञानोबा शिंदे,श्रीपती पाटील,मारोती नळगिरे,दिलीप इंगळे,प्रदीप पाटील इंगोले,हाणमंत मुगवणे,सुधाकर सादगिरे,दत्ता बापुणे, विश्वनाथ आरण्ये,गणेश माळेगावे,किशोर अस्वले,निवृत्ती देवमारे आदि यावेळी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here