• Home
  • पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढी विरोधात आ. राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन.

पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढी विरोधात आ. राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210223-WA0019.jpg

पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढी विरोधात आ. राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन.

कोल्हापूर : हातकणंगले विधान सभेचे आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली
हातकणंगले तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने पेट्रोल,डिझेल,गँसच्या दरवाढीविरोधात हातकणंगले तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या असून त्यात दररोज वाढ होत आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेवर मोदी सरकारने इंधन दरवाढीचा आघात केला आहे.
केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या जनतेची अशाप्रकारे लूट कदापी मान्य होणार नाही. सरकारने इंधन दरात तात्काळ कपात करावी अन्यथा जनतेच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला.
यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष भगवानराव जाधव, सुरेश नाईक, भैरवनाथ पवार, विजय गोरड, किरण माळी, सदानंद महापुरे, जावेद पाथरवट,सुरज जमादार, निवृत्ती शिंदे, कृष्णा वाठारकर आदी उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment