Home अमरावती अमरावतीत आजपासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांची मोफत वाटप.

अमरावतीत आजपासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांची मोफत वाटप.

41
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_054003.jpg

अमरावतीत आजपासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांची मोफत वाटप.

दैनिक युवा मराठा
पीएन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील १,२७,४६५ अंतोदय श्रीराम पत्रिका धारकांना प्रति वर्ष प्रती कुटुंब एक साडी रेशन दुकानातून मोफत मिळणार आहे.. याबाबतचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे २५ जानेवारीला घेतला होता. प्रत्यक्षात साडीचे गट्टे दोन दिवसापूर्वी तालुक्याच्या गोदामात पोहोचले आहे. त्यामुळे बुधवारपासून या मोफत साड्या किंवा वाटप सुरू होणार असल्याने होळीचा रंग गौहीरा होणार आहे.कॅप्टिव्ह योजनेअंतर्गत अंत्यदय रेशन कार्डधारक प्रत्येक कुटुंबाला ई-पाॅस मशीनद्वारे एक साडीचे वापर करण्यात येणार जानेवारी (प्रजासत्ताक दिन) ते २४ मार्च (होळी) यादरम्यान मोफत साड्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात या साड्यांच्या गाठी(साड्या/१००/वजन ४१ते४६ किलो) दोन दिवसांपूर्वी संबंधित गोदाम पर्यंत पोचले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी दिली. साठवणूक व हाताने करताना साड्या खराब होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचना पुरवठा विभागाने केलेली आहे. या योजनेसाठी शासनाने राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था नेमनुक म्हणून केली आहे. तालुका न्याय लाभार्थी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार अचलपूर तहसील कार्यालयास ६५३८, अमरावती ५८९८, मोर्शी ८०४६, अंजनगाव सुर्जी ६१४४, भातकुली ४५९५, चांदुर रेल्वे४०९३, चांदूरबाजार ८२९५, चिखलदरा २०३९५, दर्यापूर ६३७९, धामणगाव रेल्वे ५३५५, धारणी २६,०२६, नांदगाव खंडेश्वर ५२३९, दिवसा ४३०१, वरुड ८२१८ व अमरावती एफडीओ कार्यालयास ७९४३ साड्या वाटपाची उद्दिष्ट आहे. रेशन घेण्यासाठी सरकारी पिशवी पोहोचली नाही. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दहा किलोचे क्षमता असलेली एक पिशवी रेशन दुकानातून मोफत देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने ८ जानेवारीला स्पष्ट केले होते. सहा महिन्याच्या अंतराने एक पिशवी अशी ही योजना आहे. देण्यात येणाऱ्या या पिशव्याच्या ठाव ठिकाणात नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील प्रत्येक अंत्योदय कुटुंबास रेशन दुकानातून बुधवारपासून एक साडी मोफत मिळेल साड्यांचे गट्टे सर्व तालुक्यांना व जिल्ह्यात पोचले आहे. असे प्रज्वल पाथरे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here