Home जालना सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश

सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश

15
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_054520.jpg

सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश

———–
अंबड/ जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: तालुक्यातील डोणगाव व शहागड येथील असंख्य युवकांसह  शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी  भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या हस्ते नेतृत्वाखाली काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.मोदिजींच्या विचारानुसार  सबका साथ…सबका विकास हे धेय्य ठेऊन सतीश घाटगे यांच्या  नेतृत्वाखाली  घनसावंगी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कार्य करत आहे. कोणत्याही संविधानिक पदावर नसताना सतीश घाटगे गावागावातील विकासाचे प्रश्न सोडवत आहेत. तसेच समृद्धी साखर कारखान्यामार्फत विविध सामजिक उपक्रम राबवून जनतेला दिलासा देत आहे. त्यामुळे गावागावातील युवक , ज्येष्ठ कार्यकर्ते इतर पक्ष सोडून सतीश  घाटगे यांच्यासोबत भाजपा मध्ये येत आहेत.  शहागड येथील  आसेफ कुरेशी, जमिरोद्दिन बागवान, मोहन येटाळे, ज्ञानेश्वर फरताडे तर डोणगाव येथील  राष्ट्रवादीचे  सोहेल पठाण, अरबाज पठाण, जुबेर पठाण, असमल शेख, अय्याज पठाण, प्रदीप मगरे, अमर भालेराव, आशिष गोसावी, अफताब खान, जावेद शेख, जुनेद शेख, सिद्दिकी शेख, जुनेद शेख , कपिल वाघ, कमलेश हंगार्गे, राजू जायभाये, भगवान जायभाये, संतराम सौंदरमल, पवन उबाळे, ज्ञानेश्वर जायभाये  या युवकांनी यावेळी प्रवेश केला.सर्वांचे सतीश घाटगे यांनी  भाजपमध्ये स्वागत करून सत्कार केला.  यावेळी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमेश तारगे, प्रल्हाद जिजा सोळुंके,  बंडू खाडे, सुरेश मुंढे व तोफिक पटेल, शिवाजी जायभाये अक्षय मुंढे, शोएब पटेल, नजीर शहा,अशोक बोधे, इरफान पठाण, इकबाल बागवान , महेश कांबले, विठ्ठल  खराद , जमिरोद्दिन बागवान,मोहन येटाऴे  आदींची उपस्थिती होते.

Previous articleअमरावतीत आजपासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांची मोफत वाटप.
Next articleमहाशिवरात्रीनिमित्त बरडी येथे उद्या श्री. भोेलेश्वर दर्शन  सोहळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here