• Home
  • रेशेनकार्ड श्वेत होणार बंद नाही

रेशेनकार्ड श्वेत होणार बंद नाही

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210206-WA0007.jpg

रेशेनकार्ड श्वेत होणार बंद नाही

रेशनकार्डधारकांचे उत्पन्न १ लाखाहून अधिक असल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार, अशा बातम्या प्रसिध्द हाेत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नाही. तर केसरी किंवा लाभार्थी रेशनकार्ड असणारे व यापैकी ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्यावर आहे त्यांचे कार्ड श्वेत होणार आहे. याचाच अर्थ कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होईल, अशी माहिती रेशनिंग व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम दिनांक १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न १ लाखाहून अधिक असल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार, अशा बातम्या व्हायरल हाेत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नाही. तर केसरी किंवा लाभार्थी रेशनकार्ड असणारे व यापैकी ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्यावर आहे त्यांचे कार्ड श्वेत होणार आहे. याचाच अर्थ कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होईल, अशी माहिती रेशनिंग व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम दिनांक १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
कार्डधारकांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जाईल. मात्र, तरीही संबंधित व्यक्ती ते आणण्यास असमर्थ ठरली तर त्याची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. उदाहरणार्थ निवासस्थानाच्या पुराव्याबाबत छाननी करताना काही संशयास्पद आढळल्यास, शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत संशय आल्यास त्याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येईल.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment