• Home
  • बुलेट थाळी फस्त करा…आणि जिंका बुलेट मोटरसायकल! पुणेतील अजब गजब फंडा

बुलेट थाळी फस्त करा…आणि जिंका बुलेट मोटरसायकल! पुणेतील अजब गजब फंडा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210130-WA0066.jpg

पुणे ३० जानेवारी ⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे⭕
पुणे | पुण्यातील वडगाव मावळ येथील शिवराज हॉटेलचा एक अनोखा मार्केट फंडा चांगलाच व्हायरल झाला. कोरोनानंतर हॉटेल व्यावसाय चांगला चालण्यासाठी मालकाने शक्कल लढवली आहे. त्यांनी हॉटेलमध्ये खायला अशक्य अशी ‘बुलेट थाळी’ ठेवली आहे. ही थाळी संपवणाऱ्याला नवीकोरी बुलेट देण्यात येत आहे. पण ही गोष्ट अशक्य असल्याची चर्चा होती. पण बार्शीच्या एका पैलवानाने ही थाळी फस्त करत बुलेट जिंकली आहे.

गेल्या जवळपास महिनाभरापासून ही थाळी सुरु केली आहे. थाळी फक्त एका व्यक्तीने एका तासाच्या आत संपवल्यास त्याला नवीन बुलेट देण्यात येणार आहे. यासाठी हॉटेल मालकाने हॉटेलच्या दारात १.७० लाखांच्या पाच बुलेट उभा केल्या आहेत.

दरम्यान, ही थाळी सुरु झाल्यापासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खवैय्यांनी या थाळीवर ताव मारला. पण नियमाने ही थाळी कोणाला संपवता आली नाही. त्यामुळे या हॉटेलमालकाच्या ऑफरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशातच आता एका पट्ट्याने ही थाळी फस्त करत बुलेट जिंकली आहे.

दररोज होणाऱ्या तोबा गर्दीतून कोणालाही शक्य न झालेली गोष्ट बुधवारी घडलेली आहे. ही थाळी सर्वप्रथम एका पैलवानाने यशस्वी संपवली आहे. या बुलेट विजेत्याचे नाव सोमनाथ पवार असं आहे. बुलेट थाळी फस्त करणारा युवक हा सोलापुरच्या बार्शी येथील आहे.

बुलेट थाळी चॅलेंजमध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये चार लोक पोटभर खाऊ शकतील इतक्या मोठ्या प्रमाणात जेवण वाढले जाते. यामध्ये चार पापलेट, चार सुरमई, चार चिकन लेग पिस, कोळंबी करी अर्धी हांडी, मटन मसाला, चिकन मासाला आर्धी हांडी, चार भाकरी, चार रोटी, सुकट आर्धी प्लेट, कोळंबी कोळीवाडा, चार बिस्लरी बॉटल, रायता एक मोठी वाटी, सोलकडी चार वाट्या कोळंबी बिर्याणी आणि मटनाचा आळणी सूप चार वाट्या इतक सर्व थाळीमध्ये दिले जाते.

anews Banner

Leave A Comment