• Home
  • नांदेड जिल्ह्यात उद्या रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. लाभ घेण्याचे आवाहन..

नांदेड जिल्ह्यात उद्या रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. लाभ घेण्याचे आवाहन..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210130-WA0068.jpg

नांदेड जिल्ह्यात उद्या रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. लाभ घेण्याचे आवाहन..
मनोज बिरादार मुखेड ता.प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातउद्या दिनांक 31 जानेवारी 2021रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावे. रविवारी आयोजित करण्यात आलेली लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात एकूण 65 आरोग्य केंद्रावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी चार लाख 5 हजार वॅक्सिंन उपलब्ध झाले असून 120 पथकेही या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सज्ज झाली आहेत. पल्स पोलिओ दिन 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील तीन लाख 15 हजार 694 बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले असून यासाठी चार लाखावर वेक्सिंन उपलब्ध झाले असून जिल्ह्यातील 2228 बुधवर हे डोस उपलब्ध असणार आहेत दरवर्षी पोलिओ लसीकरण दिवस साजरे करण्यात येतात.पल्स पोलिओ मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुलांना रविवारी सकाळी 8 ते 5 या वेळेत नजीकच्या बुथवर जाऊन लसीचा डोस पाजून घ्यावा अशी माहिती जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेडचे डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली आहे.

anews Banner

Leave A Comment