Home नांदेड भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथील घटनेच्या निषेधार्थ सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मुखेड...

भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथील घटनेच्या निषेधार्थ सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मुखेड तहसिल समोर तिव्र निदर्शने आंदोलन..

80
0

राजेंद्र पाटील राऊत

भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथील घटनेच्या निषेधार्थ सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मुखेड तहसिल समोर तिव्र निदर्शने आंदोलन..

मुखेड ता. प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील अदिवासी समाजातील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन निघृन हत्या केलेल्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.यासाठी दि २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पवन जगडमवार व संदिप पिल्लेवाड यांच्या नेतृत्वाखाली मुखेड शहरातील बाह्राळी नाका येथून मौर्चा काढून मुख्ये रस्त्याने जौरदार घोषणा देत मुखेड तहसिल समोर तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले होते.दोन तास तहसिल समोर हे निदर्शंने केल्यानंतर मुखेड चे तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी राजु गंदपवाड,रवी गंदपवाड,सुर्यकांत आल्लडवाड, शेकापचे गोविंद डूमणे,ज्ञानेश्वर डोईजड,रियाज शेख,रामदास पाटील,शेतकरी कामगार पक्षाचे शिवशंकर पा. कलंबरकर पिपल्स रिपब्लिकन पार्टी ता.अध्यक्ष विजय बनसोडे, स्वाभिमानी संभाजी बिग्रेड च्या वतिने हर्षवर्धन पाटील बेळीकर,जिल्हाउपाध्यक्ष योगेश पा.जांभळीकर,एसएफआय च्या वतिने आकाश देशटवाड,श्रीनिवास गोविंदवार,छावा संघटनेच्या वतिने व्यंकट पाटील, कपिल गोणारकर, गणेश अकुलवाड,गोविंद हिवराळे,शिवकुमार बिरादार,व्यंकट गोविंदवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक या आंदोलनात सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here