• Home
  • मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु.) येथून अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनास सुरुवात.

मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु.) येथून अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनास सुरुवात.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210125-WA0071.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु.) येथून अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनास सुरुवात.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा बु. येथे श्री राम जन्मभूमि निधी संकलनास सुरुवात करण्यात आली.अयोध्या मध्ये सुरू असलेल्या भव्य अश्या श्री राम मंदिर निर्माण कार्यात आपलाही खारीचा वाटा राहावा यासाठी मुखेड तालुक्यातून निधी संकलन कार्य सुरू असून दिनांक 24 जानेवारी रोजी मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथील श्रीराम भक्तांनी अयोध्या येथे भव्य मंदिर निर्माण देणगी म्हणून 16000 रुपये निधी देऊन आपला हातभार लावला निधी संकलनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यावेळी श्रीराम भक्त विठ्ठल पाटील राम सावळेश्वरकर भगवान गुंडावार सतीश सावकार मोतेवार विठ्ठल कल्याणपाड पत्रकार देवीदास पाटील बाबू सावकार उलिगडे अल्लाप्रसाद शंकर कल्याणपाड नरसिंग पांचाळ बाळू झाडे शरद सावकार मोतेवार निधी संकलनासाठी आदींनी परिश्रम घेतले यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment