Home नांदेड मुखेड तालुक्यातील कुंद्राळा प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी शेतीला पाणी सोडण्यात यावे परिसरातील शेतकऱ्यांनी...

मुखेड तालुक्यातील कुंद्राळा प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी शेतीला पाणी सोडण्यात यावे परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी..

93
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील कुंद्राळा प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी शेतीला पाणी सोडण्यात यावे परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी..
मनोज बिरादार मुखेड तालुका प्रतिनिधी. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील कुंद्राळा मध्यम प्रकल्पातून गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प शंभर टक्के भरूनही केवळ कालवा दुरुस्तीच्या कारणामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने पाटबंधारे विभागाच्या मनमानी कारभारा तालुक्यातील शेतकरी कंटाळले असून मुखेड तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविणारा एकमेव कुंद्राळा मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पात 10.42 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून उपयुक्त पाणी साठ्यावर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे तालुक्यातील आठ ते दहा गावातील दोन हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येते. रब्बी व उन्हाळी हंगामात या प्रकल्पातून पाणी पिकांना मिळत होते परंतु गतवर्षीपासून कालवा दुरुस्तीचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने दोन वर्षापासून प्रकल्प शंभर टक्के भरुनी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत नसल्याने रब्बी हंगाम हातचा गेला व उन्हाळी हंगाम ही वाया जाणार की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतीस तात्काळ पाणी देण्यात यावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here