Home नांदेड नायगाव मतदार संघासाठी १३० कोठी सरकारकडून मंजूर आता विकास थांबणार नाही –...

नायगाव मतदार संघासाठी १३० कोठी सरकारकडून मंजूर आता विकास थांबणार नाही – आ.राजेश पवार

113
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव मतदार संघासाठी १३० कोठी सरकारकडून मंजूर
आता विकास थांबणार नाही – आ.राजेश पवार

नांदेड, दि.२६ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

मागच्या १५ वर्ष्या पासून नायगाव मतदार संघाची सगळ्या गोष्टीत पिळवणूक झाली आहे. अन त्यात प्रमुख म्हणजे रस्त्याअभावी नागरिकांचे होणारे बेहाल.

नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी पहिल्या अधिवेशना मधेच मतदार संघातील रस्ताची समस्या सभागृहात मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात तब्बल १३० कोटी रुपयांचा निधी सरकार कडून मंजूरही करून घेतला.

सदरील विविध रस्त्यांचे त्यात रेल्वे उडानपुल, बाह्य वळण रस्ता आणि इतर कामाचे भूमिपूजन काल धर्माबाद येथे करण्यात आले त्यावेळी त्यांच्यासोबत बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, अमरनाथ राजूरकर,माजी आ.वसंत चव्हाण, जिल्हापरिषद अध्यक्ष मंघारणी अंबुलगेकर आदीजण उपस्थित होते.

तर यावेळी बोलताना सरकार कुणाचेही असो आता नायगाव मतदार संघाचा विकास थांबणार नाही असे आमदार राजेश पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here