Home मराठवाडा शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते रामलीला मैदानाचे लोकार्पण सोहळा...

शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते रामलीला मैदानाचे लोकार्पण सोहळा संपन्न

126
0

राजेंद्र पाटील राऊत

शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते रामलीला मैदानाचे लोकार्पण सोहळा संपन्न

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज

हिंगोली, दि.२६ – दीडशे वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक रामलीला मैदानाचे जिल्हा नियोजनअंतर्गत ४ कोटी रुपये खर्च करुन रामलीला मैदानास संरक्षण भिंत तयार करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मैदानाचे सपाटीकरण करुन मैदानाच्या आतील भागात चारही बाजूंनी पद पथ (रनींग ट्रॅक) व वृक्षारोपण करुन मैदानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या मैदानाचे लोकार्पण आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन व फित कापून करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार सर्वश्री राजीव सातव, हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा हे उपस्थित होते.

Previous articleओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास ओबीसी महासंघाचा तीव्र आंदोलन इशारा
Next articleनायगाव मतदार संघासाठी १३० कोठी सरकारकडून मंजूर आता विकास थांबणार नाही – आ.राजेश पवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here