• Home
  • नविन वर्षात इचलकरंजीत जनसंपर्क कार्यालय,खा.धैर्यशील माने.

नविन वर्षात इचलकरंजीत जनसंपर्क कार्यालय,खा.धैर्यशील माने.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर हे आपल्या लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठे शहर असुन शहरातील वस्त्रोद्योग,पर्यावरण सहित अनेक समस्या आपणाशी निगडित असतात.सदर समस्यांचे निराकरण व्हावे तसेच नागरिकांना आपणाशी संपर्क साधणे सुलभ व्हावे याकरिता आपण इचलकरंजी शहरात तातडीने जनसंपर्क कार्यालय सुरू करावे असे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने खासदार धैर्यशील माने याने आज देण्यात आले.
यावेळी गेल्या वर्षीच कार्यालय सुरू करायचे होते परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे जनसंपर्क कार्यालय सुरू करता आले नाही, नववर्षात इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले मधील नागरिकांच्या सोयीसाठी इचलकरंजी शहरात मध्यवर्ती कार्यालय काढण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी नगरसेवक रविंद्र माने,भाऊसो आवळे,सयाजी चव्हाण इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील,अमितकुमार बियाणी,राजु कोंनूर,राजुदादा आरगे,उदयसिंह निंबाळकर,अभिजित पटवा उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment