Home Breaking News ऐतिहासिक व्हि.पि.एल.चे प्रथम क्रमांकाचे मानकरी दुर्गुळे सनरायझर्स

ऐतिहासिक व्हि.पि.एल.चे प्रथम क्रमांकाचे मानकरी दुर्गुळे सनरायझर्स

162
0

 

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वडगांव शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांव शहरात आई अबांबाईच्या आशिर्वादाने  वडगांव प्रिमीयर लिग 2020 हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबावाडी येथे गेल्या आठवढाभर सुरू आसलेली वडगांव प्रीमियर लिग २०२० या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी फायनल मध्ये दोन बलाढ्य संघ कुडाळकर इलेवन विरूध्द दुर्गूळे सनरायझर्स संघामधे चुरस होऊन या स्पर्धेच नाणे फेक दुर्गूळे सनराइझर्स संघाने जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन आठ षठकात ६४ / ७ इतक्या धावा काढल्या .
कुडाळकर संघाने आठ षटकात ६१ / ६ इतकिच मजल मारता आली. त्यामुळे अवघ्या ३ धावांनी दुर्गूळे सनरायझर्स संघाने विजय मिळवला.
वडगांव प्रीमियर लिग 2020 चा ऐतिहासिक विजयाचे प्रथम क्रमांकाचे माणकरी दुर्गूळे सनरायझर्स संघाला २५००० रूपये रोख बक्षीस आणि चषक,
ऐतिहासिक विजयाचे द्वितीय क्रमांकाचे माणकरी कुडाळकर इलेवन संघाला १५००० रूपये आणि , ऐतिहासिक विजयाचे तृतीय क्रंमाकाचे माणकरी राम राँयल संघाला १०००० रूपये रोख आणि चषक देण्यात आले. आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट शिस्तबद्ध संघासाठी डि.के.लाँयन या संघाची निवड करण्यात आली.
या शेवटच्या सामण्यासाठी प्रमुख पाहुणे वारणा उद्योग समूहाचे श्री.विश्वेश कोरे हस्ते फायनल सामण्याचे उदघाटण करण्यात आले , यावेळी  महेंद्र शिंदे उद्योजक,लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी, बाबासाहेब पाटील ,अमर पाटील , नगरसेवक अजय थोरात दादा , नगरसेविका सौ.सावित्री घोटणे , नगरसेवक सौ.अल्का गुरव ,नगरसेवक जवाहर सलगर ,अमोल हुकेरी दादा उद्योजक, सागर गुरव ,श्री अमित घोटणे सर ,नंदू बेलेकर, अमित राठोड, सुकुमार देसाई ,अमर घारसे ,धैर्यशील सालपे, सुनिल नाझरे , राकेश हमिदवाडे , नगरसेवक संदीप पाटील बाबा , अभिजीत गायकवाड , दिलीप शिंदे ,युवा मराठा चे संपादक मोहन शिंदे ,राष्ट्वादीचे आप्पासाहेब पाटील , अनिल म्हेत्तर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. समालोचन साठी विषेश सहकार्य लल्लन आँर्केस्ट्रा,सुरज पाटील , सुनिल कुमार .
विषेष सहकार्य अमोल लठ्ठे माजी उत्कृष्ट खेळाडू , अँम्पायरसाठी विशेष सहकार्य
शिवाजी कामते , सुनिल पाटील यांचे लाभले .
या वडगांव प्रीमियर लिग साठी बकऱ्याची पैज लागली होती. कुडाळक इलेवन कडून भारत पाटील यांचा बकरा आणि दुर्गूळे संघाकडून रामदास घोरपडे यांचा बकरा . त्यामुळे आता भरत पाटलांनी बकऱ्याची पैज हारली.
या वडगांव प्रीमियर लिग 2020 साठी उत्कृष्ट नियोजन केले व मोलाचे सहकार्य कमिटीचे सर्व कार्यकर्ते आणि माँर्निग क्रिकेट क्लबचे ही सहकार्य लाभले आहे.
संकलन- मोहन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleनवीन मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांचे आवाहन..
Next articleनविन वर्षात इचलकरंजीत जनसंपर्क कार्यालय,खा.धैर्यशील माने.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here