• Home
  • कौळाणे – व-हाणे पत्रकार भवनला विरोध करणाऱ्या चोरांच्या हाती पुन्हा किल्ल्या देणार का? मतदारांना प्रश्न !

कौळाणे – व-हाणे पत्रकार भवनला विरोध करणाऱ्या चोरांच्या हाती पुन्हा किल्ल्या देणार का? मतदारांना प्रश्न !

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1608201872304.jpg

कौळाणे – व-हाणे पत्रकार भवनला विरोध करणाऱ्या चोरांच्या हाती पुन्हा किल्ल्या देणार का? मतदारांना प्रश्न !
(ग्रामपंचायत निवडणूक वार्तापत्र)
मालेगांव/राजेंद्र पाटील राऊत
सध्या ग्रामपंचायत निवडणूकीचा धुमाकूळ सुरु आहे,आम्ही कौळाणे (निं) व व-हाणे या गावी पत्रकार भवनच्या मागणीसाठी शासकीय नियमानुसार पाठपुरावा सुरु केलेला असतानाही,काही मुठभर झारीतले शुक्राचार्य या सामाजिक कार्याला विरोध करुन आडकाठी आणत आहेत.वास्तविक आता या निवडणूकीत आम्हीच खरे जनतेचे सेवक आणि आम्हीच खरे गावाचे विकासपुरुष या अविर्भावात वावरणारे काही बांडगुळही आता कौळाणे (नि.) व-हाणे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत स्वतः चे नशिब अजमावयाला निघाले आहेत.पण…सुजान मतदार राजा असलेल्या नागरिकांनी आता खरे तर या उमेदवारांना पुढील प्रश्न विचारले पाहिजेत.गाव विकासाच्या नावाने निवडणूक लढविणा-या भामटया हडवाळीनी गावात अतिक्रमण वाढले तेव्हा गाव सुधारणा कोठे ठेवलेली होती.त्याशिवाय पत्रकार भवनला वैयक्तिक स्वार्थापोटी विरोध करणारे गावाचे नेमके कोणते भले करणार आहेत?पंधराव्या वित आयोगाचा दरमानशी येणारा पैसा नेमका कुठे खर्च केला?आणि कुणाच्या परवानगीने?त्याशिवाय छपन्न गाव योजनेचे अनियमित येणारे पाणी नियमित व सुरळीत करण्यासाठी या गाव विकासाच्या नावाखाली भुलथापा देणाऱ्याना मतदारांनी हे प्रश्न अवश्य विचारावेत.ज्यांनी फक्त स्वस्वार्थासाठी ग्रामपंचायतीला आपल्या बापजाद्याची खासगी मालमता समजून हि निवडणूक लढविण्यासाठी पैश्यांचा अतोनात ओघ सुरु केला आहे,दारु मटनाच्या पार्ट्या देऊन गावाला विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या चोरांना त्यांची लायकी जरुर या निवडणूकीत मतपेटीतून मतदार बांधवानी दाखवून जनतेच्या सुख दुःखात अडीअडचणीत उभे राहून धावून जाणाऱ्याच्या पाठीशीच खरे तर उभे राहून परिवर्तनाची नांदी घडवावी.
(जनहितार्थ युवा मराठा न्युज परिवार)

anews Banner

Leave A Comment