• Home
  • भारत बटालीयनच्या जवानांचे वाठार येथे विलगीकरन

भारत बटालीयनच्या जवानांचे वाठार येथे विलगीकरन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201127-WA0031.jpg

भारत बटालीयनच्या जवानांचे वाठार येथे विलगीकरन

पेठ वडगांव : भारत राखीव बटालियनचे १०५ जवान कोल्हापूर येथे आगमन झाले आहे .
पण त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे होते अशा वेळी सर्व जवानांची सोय करणं अवघड आहे हे लक्षात येताच श्री ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन च्या वतीने त्या सर्व जवानांची वाठार येथे विलगीकरण करण्याची व वसतिगृहात रहाण्याची सोय करण्यात आली आहे . प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत व अडचणीच्या वेळी श्री ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन अग्रेसर असते मग तो महापूर असो किंवा कोरोना असो प्रत्येक आपत्तीत मुळे फौंडेशन आपलं योगदान देते. म्हणून देशाच्या सीमांच रक्षण करणाऱ्या जवानांची सेवा करण्याची संधी मिळत असल्यामुळे व आपलं कर्तव्य म्हणून हे काम केले असल्याचे सांगितले, या योगदानाबद्दल भारत बटालियन कोल्हापूर चे पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक निदेशक एन एम पराडकर यांनी आभार मानले . या कमी डॉ ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन चे अध्यक्ष अनिल नानीवडेकर यांचे सहकार्य लाभले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment