• Home
  • मुखेड तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुन्हा संकटात !

मुखेड तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुन्हा संकटात !

मुखेड तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुन्हा संकटात !
(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
जाहुर:परतीच्या पावसाने शेत पिकाच्या नुकसानीत भर घातली आहे.दर वर्षी आंक्टोबर महिन्याच्या अगोदर परतणाऱ्या पावसाचा या वर्षी मुक्काम लांबल्याने शेतातील वेचणीस आलेला कापूस व काढणीस आलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने परीसरात जोर धरला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. शेतात कापूस फूटला आहे.काही शेतकरी कापूस वेचणीस सूरुवात केली आहे. सततच पाऊस पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा शेतातील कापूस मातीमोल झाला आहे. उर्वरित असलेले बोंडे काळी पडून नासत आहेत.याची प्रचिती जाहूरसह उंद्री (प.दे) राजुरा भाटापुर चोंडी बिल्लाळी आदी परीसरात पहावयास मिळत आहे.

मजूराअभावी शेतातील कामे खोळंबली
*मजुराअभावी अनेक शेतातील कामे खोळंबली आहेत परतीच्या पावसाचा प्रवास लांबल्याने सगळीकडे पिक काढणीच्या कामास वेग आला आहे.सोयाबिन कापणी आणि मळणी सुरू आहे.तसेच कापूस वेचणी सुरुवात आहे.मजुरांची कमतरता जाणवत असल्याने काही शेतातील कापूस वेचणीची कामे खोळंबली आहेत.या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना चांगला फटका बसणार आहे.

सततच्या पावसाने कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे.बोंडे सडायला लागल्याने व कापूस भिजल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.शासनाने आथिर्क मदत द्यावी केवळ आश्र्वासने देवू नये
– हानमंत कोत्तावाड शेतकरी उंद्री (प.दे)

anews Banner

Leave A Comment