Home परभणी राष्ट्रीय महामार्ग 548 – बी रस्त्याच्या कामाबाबत भाकप चा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

राष्ट्रीय महामार्ग 548 – बी रस्त्याच्या कामाबाबत भाकप चा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20221016-WA0048.jpg

राष्ट्रीय महामार्ग 548 – बी रस्त्याच्या कामाबाबत भाकप चा जलसमाधी आंदोलनाचा इशारा
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी:-परभणी जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ बी या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. तसेच अनेक वेळा या रस्त्यावरील पडलेल्या मोठ – मोठ्या खड्ड्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत व आताही होत आहेत याच महामार्गावरील पाथरी – सेलू या मार्गावर खड्ड्यामुळे ट्रक पलटी होऊन अपघात घडन्यासारखे प्रकार होत आहेत. व काही दिवसांपूर्वीच याच मार्गावर खड्ड्यात ट्रक अडकून पडल्यामुळे दिवसभर वाहतुक कोंडी झाली होती.
तसेच काही महिन्यापूर्वी या महामार्गावरील पाथरी – सोनपेठ या रस्त्यावरील बाभळगाव फाटा येथे खड्ड्यामुळे ऊसाने भरलेला ट्रक्टर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरावर कोसळला त्यामुळे एक महिला व एका मुलीचा मृत्यू झाला तसेच याच मार्गावर खराब व अरुंद रस्त्यामुळे ऊसाने भरलेली ट्रक्टर ट्रोली प्रवासी ऑटोरिक्षावर पडल्यामुळे दोन महिला मृत्यूमुखी पडल्या होत्या. याबाबत वर्तमान पत्रात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या त्यामुळे आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूर – मातुर दुरुस्ती केली होती. तरीही आता या रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. आणि याच मार्गावरील मौजे लिंबा येथील पुलाजवळ एका शेतकऱ्याची म्हैस खड्ड्यात अडकून पडली होती.

पाथरी – सोनपेठ रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले मात्र, रस्त्याची स्तिथी आजही ‘जैसे थे’ च आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे नागरिक, वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत असुन दुरुस्तीची मागणी होत आहे त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु करण्याबाबत आपल्याकडे वारंवार निवेदन सादर करूनही आपण या बाबत योग्य दखल घेत नसल्यामुळे व या रस्त्याचे काम होत नसल्यामुळे व आपल्या विभागाच्या कारभारास कंटाळून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मौजे उमरा ता. पाथरी जि. परभणी येथील गोदावरी नदीच्या पात्रात दिनांक २२ / १० / २०२२ रोजी सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घेण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here