*देवळा तालुक्यात गुंजाळनगर करला धरणात शेतमजुराचा बुडून मृत्यू*
देवळा:-देवळा तालुक्यातील गुंजाळनगर शिवारातील करला धरणात आंघोळीसाठी गेलेला शेतमजूर बुडाला असल्याची घटना घडली सोमवार दि ५ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मांजरी ता साक्री जि धुळे येथील शेतमजूर श्री शांताराम सुक्राम सोनवणे वय वर्षे ( ६५ ) कामानिमित्त गुंजाळनगर येथे मजुरी साठी आलेला इसम अंघोळीला गेल्यामुळे बुडाल्याचे समोर आले सदर इसम घरी न आल्याने त्याची चौकशी केली असता आज सकाळी करला धरणाजवळ त्यांच्या घरच्यांना सोनवणे यांचे कपडे आढळून आले त्यामुळे ते धरणात बुडाले असल्याची खात्री करून त्यांच्या नातेवाईकांनी गुंजाळनगर येथील पोलीस पाटील योगेश गुंजाळ यांना दिल्यानंतर त्यांनी देवळा पोलिसांत तक्रार दिली असता देवळा पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरु केले असता बुडालेल्या वृध्द इसमाला बाहेर काढण्यात यश आले सदर मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात येऊन अतंविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढिल तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर पोलीस कर्मचारी राठोड. आहिरे अदी करित आहेत
*धरणात बुडवून मृत पावल्याची महिनाभरात ही तिसरी घटना असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे*