• Home
  • *कौळाणेत विकासाच्या नावाखाली* *”अपना काम बनता भाड मे जाये जनता”!*

*कौळाणेत विकासाच्या नावाखाली* *”अपना काम बनता भाड मे जाये जनता”!*

*कौळाणेत विकासाच्या नावाखाली* *”अपना काम बनता भाड मे जाये जनता”!*
*मालेगांव,(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* कौळाणे (निं.) हि बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची जन्मभूमी.या गावाचे नाव सयाजीराव महाराजांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वामुळे संपूर्ण जगभर पोहचलेले आहे.मात्र अशा या गावात कपाळकरंटया ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक के.सी.अहिरे ,संजीव घोंगडे तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव यांच्या कार्यकाळात विकासाच्या नावाखाली तीनतेरा नऊबारा वाजलेले असून, हे गाव आज विविध समस्यांनी ग्रासलेले आहे.एका बाजूला के.सी.अहिरे या ग्रामसेवकाच्या काळात झालेली गिरणा नदीपासून तर गावापर्यतची लाखो रुपये खर्च केलेली पाणीपुरवठा योजना साफ अयशस्वी ठरल्याने दुर्दैवाने गावावर विकतचे पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपली आहे.तस बघितलं तर या गावाच्या एक ना अनेक नाना भानगडी विकासाच्या नावाखाली घडलेल्या आहेत.मोठाच गाजावाजा करुन महाराजांच्या नावाने नांदगाव फाटा व सोनज फाटा येथे प्रवेशव्दार उभारण्यात आले,मात्र प्रवेशव्दारावरुनच नेमके महाराजांची प्रतिमा फोटो असलेले चित्र गायब होऊन त्याशिवाय गावाची माहितीही प्रवेशव्दारावरुन लुप्त पावल्याने त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव व ग्रामसेवक के.सी.अहिरे यांच्या कार्यकाळातील हा देखावा फक्त क्षणभंगूरच ठरला.त्या पेक्षाही या गावाची सगळ्यात वाईट व भयंकर अवस्था अशी आहे की,ज्यांनी घरकुलेच बांधले नाहीत,मात्र घरकुलांचा अनुदानाचा लाभ ग्रामपंचायतीच्या आशिर्वादाने मात्र बरोबर लुटला आहे.अशीच काहीशी परिस्थिती शौचालयाच्या बाबतीतही आहे अस्तित्वात नसलेल्या शौचालयाचे देखील अनुदान ग्रामपंचायतीच्या कृपाशिर्वादाने लाटण्यात आले.अशा पध्दतीचा भोंगळ कारभार या ग्रामपंचायतीने विकासाच्या नावाखाली करुन ठेवला.एकंदरीत काय तर…अपना काम बनता ,भाड मे जाये जनता अशीच कार्यपद्धती ग्रामसेवक के. सी.अहिरे,संजीव घोंगडे तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव यांच्या कार्यकाळात बिनधास्तपणे राबविण्यात येऊन विकासाच्या नावाखाली अक्षरशः धुमाकूळ घातला गेला. (क्रमशः -उद्या वाचा-भुमिगत गटारी बनविण्याचा अभ्यास करायला कौळाणेला या)

anews Banner

Leave A Comment