Home गडचिरोली पोलीस भरती दुर्गम भागातील युवक मारणार बाजी।

पोलीस भरती दुर्गम भागातील युवक मारणार बाजी।

74
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220406-WA0021.jpg

पोलीस भरती दुर्गम भागातील युवक मारणार बाजी।                    गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
दुर्गम व अतिदुर्गम भागातील जास्तीत जास्त युवकांची पोलिस भरतीत निवड व्हावी.या उद्देशाने पोलिस विभागामार्फत मागील काही दिवसापासुन त्यांना भरती पुर्व प्रशिक्षण देत आहेत.यामुळे हे युवक आता येणार्या भरतीत आपली ताकद दाखविणार आहेत.भामरागड तालुक्यातील शासकिय आश्रमशाळा तोडसा येथिल 20 विद्यार्थिनिनां आत्मसुरक्षेचे धडे देण्यात आले.तसेच 10 दिवसाचे स्वंयसिध्द प्रक्षिशण हि देण्यात आले या विद्यार्थानां एकलव्य धाम,पोलिस मुख्यालय गडचिरोली येथे निरोप देण्यात आला.
सदर पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण दिनांक 5 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत या कालावधित आयोजीत करण्यात आले होते.प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना पोलिस भरतीच्या अंनुषगाणे मैदाणी चाचणी व लेखी परीक्षा बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.चौथ्या बँचमध्ये 200 पुरुष उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला.580 युवक- युवतींनी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण देण्यात आले सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने लोअर,टि-शट शूज लेखी परीक्षा करिता आवश्यक अभ्यास क्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले.निरोप स्वागत समारंभ कार्यक्रमास पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण घेतलेले 200 युवक तसेच स्वंयसिध्द प्रशिक्षणाच्या 20 विद्यार्थिनी हजर होत्या.या दरम्यान उमेदवारांनी पोलिस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त केले.तसेच विद्यार्थिनीनी कराटे, ज्युडो,यासारख्या आत्मसुरक्षेचे प्रशिक्षण मिळत असल्याबाबत गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले.सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतीथी पोलिस अधीक्षक(प्रशासन) समिर शेख,अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,योगेंद्र शेंडे आधि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here