• Home
  • ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या हाती लागला वाळू माफीयांचा खजाना! कठोर कारवाईची मागणी

ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या हाती लागला वाळू माफीयांचा खजाना! कठोर कारवाईची मागणी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210330-WA0002.jpg

ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या हाती लागला वाळू माफीयांचा खजाना! कठोर कारवाईची मागणी!!  युवा मराठा न्यूज नेटवर्क सोशल मिडिया रिपोर्टर श्री जयवंत धांडे
सटाणा: – गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या अंधारात उचलण्यात आलेली सुमारे ५० ते ६० ब्रास अवैध वाळू लोहोणेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्या हाती लागल्याने सदर वाळू ग्रामपंचायतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जमा करून ताब्यात घेतली आहे. यामुळे अवैध वाळू उपसा संदर्भात पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला असून या वाळू उपशाला अटकाव घालणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या मागणी नुसार आळा बसावा म्हणून गावालगत गिरणा नदी पात्रात जाणारे रस्ते आडव्या चाऱ्या खोदून पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे लोहोणेर गावालगत गिरणा नदीवरील ऐतिहासिक पुलाच्या दोन्ही बाजूला होणारा अवैध वाळू उपसा काही दिवसां पासून बंद आहे. मात्र वसाका कार्यस्थळावरील इंग्लिश मिडीयम च्या जुन्या इमारती च्या पाठीमागील बाजूला मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याने लोहोणेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कानोसा लागल्याने आज दुपारी लोहोणेर ग्रामपंचायत पदाधिकारी तलाठी नितीन धोंडगे, पोलीस पाटील अरुण उशीरे यांच्या समवेत अचानक धाड टाकल्याने याठिकाणी सुमारे पन्नास ते साठ ब्रास वाळू साठा असल्याचे आढळून आले. या संदर्भात देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलणे करून तलाठी धोंडगे यांनी रीतसर पंचनामा करून सदर वाळू ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीने जेसीबी लावून सदर ठिकाणा वरून ही वाळू ट्रॅक्टरच्या साह्याने लोहोणेर येथे आणण्यात आली. लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी योगेश पवार, रमेश आहिरे, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, सतिष देशमुख, रतीलाल परदेशी, संजय सोनवणे, धोंडू आहिरे, चंद्रकांत महाजन, गणेश शेवाळे,समाधान महाजन, तलाठी नितीन धोंडगे, पोलीस पाटील अरुण उशीरे आदी सहभागी झाले होते.

anews Banner

Leave A Comment