• Home
  • 🛑 मराठा आरक्षणासाठी :- खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन 🛑

🛑 मराठा आरक्षणासाठी :- खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन 🛑

🛑 मराठा आरक्षणासाठी :- खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन 🛑
✍️ धुळे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

धुळे : ⭕मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्‍नी लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी आज धुळे जिल्हा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, धुळे शहराचे आमदार फारुक शहा, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानासमोर ढोल वाजवीत धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी खा.डॉ.सुभाष भामरे यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांचे स्वागत स्वतः आंदोलनात सहभागी होत असल्याची भुमिका घेतली. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पक्षाचे जोडे काढून समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सामील होवू, असे सांगत मराठा आरक्षणाला संपुर्ण पाठींबा जाहिर केला.

आ.कुणाल पाटील, आ.फारुक शाहंचा पाठींबा- मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज दुपारी धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांच्या तिरंगा चौका जवळील निवासस्थानी आणि त्यानंतर देवपूरातील आ.कुणाल पाटील यांच्या निवासस्थाना बाहेर सुध्दा ढोल बजाव आंदोलन केले. या आंदोलनाला दोन्ही नेत्यांनी सुध्दा पाठींबा देत असल्याचे जाहिर केले. आ.कुणाल पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार कटीबध्द असून आरक्षण मिळावे यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलली जात असल्याचे सांगितले.

आ. फारुक शाह यांनी सुध्दा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पुर्ण पाठींबा आहे. राज्य सरकारकडे आपण यासाठी नक्कीच पाठपुरावा करु असे आश्‍वासन आंदोलकांना दिले……⭕

anews Banner

Leave A Comment