• Home
  • 🛑 WhatsApp मध्ये येत आहे टॉप फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स 🛑

🛑 WhatsApp मध्ये येत आहे टॉप फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स 🛑

🛑 WhatsApp मध्ये येत आहे टॉप फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 27 सप्टेंबर : ⭕ व्हॉट्सअॅप जगात सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. कंपनी व्हॉट्सअॅप मध्ये लागोपाठ नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहे. कंपनीने अॅनिमेटेड स्टिकर्स, क्यूआर कोड्स, वेबसाठी डार्क मोड यासारखे अनेक फीचर्स नुकतेच आणले आहेत. आता आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार आहेत. जाणून घ्या याविषयी…

1) व्हॉट्सअॅपच्या Expiring Media फीचरची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे. सध्या हे फीचर डेव्हलपेमेंट स्टेजवर आहे. यात Self-Destructing Messages आणि Disappearing Messages नाव दिले आहे. या फीचरद्वारे युजर्संना फोटो, व्हिडिओ आणि जीफ फाईल डिलीट करता येवू शकतील. आता हे फीचर अॅप लाइव करण्यात आले नाही. WABetaInfo च्या माहितीनुसार, फीचरला बीटा रिलीज मध्ये रोल आउट करण्यात येईल.

2) मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर सोबत व्हॉट्सअॅप History Sync फीचर लवकरच रोलआउट करण्यात येणार आहे. हे फीचर द्वारे युजर्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये चॅट करु शकतील. म्हणजेच व्हॉट्सअॅप युजर आयफोन्सवर आपली चॅट मूव्ह करू शकतील.

3) Storage control WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप युजर्सला या ऑप्शन सोबत स्टोरेज ऑप्शनचे जास्त कंट्रोल मिळू शकतील. कंपनी स्टोरेज युजेस सेक्शनला रिडिझाईन करीत आहे. युजर्स आपल्या स्टोरेज सोबत सहज ऑर्गनाइज करु शकतील. त्यांना फाइल्सची गरज नाही. त्याला डिलीट करु शकतील.

4) Vacation mode व्हॉट्सअॅपकडून या फीचरला रिलीज करण्यात येणार असल्याची माहीती आहे. परंतु, wabetainfo च्या माहितीनुसार, कंपनीने यावर काम करणे बंद केले होते. आता कंपनी पुन्हा एकदा या फीचरवर काम करीत आहे. याला लवकरच लाँच केले जावू शकते. हे फीचर द्वारे युजर्स मेसेजमधये येणारे आर्काइवला म्यूट करू शकतील.⭕

anews Banner

Leave A Comment