• Home
  • *मराठा समाज जागृती मोहिमेची* *घुणकी गावातून सुरवात*

*मराठा समाज जागृती मोहिमेची* *घुणकी गावातून सुरवात*

*मराठा समाज जागृती मोहिमेची* *घुणकी गावातून सुरवात*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असुन समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ मराठा आरक्षणाचा राज्य व केंद्र सरकारने निर्णय घ्यावा. अन्यथा मराठा समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे घुणकी गावात मोहीमेत सांगण्यात आले. आज पहीले समाज जागृती मोहीम श्री महादेव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण व सर्वानी वंदन करून सुरवात केली.
यावेळी मल्हार सेनेचे जिल्हा अध्यक्ष शहाजी सिद यांनी मराठा समाजाला पाठिबा दिला.
तसेच मराठा समाजाचे मच्छिंद्र पाटील पारगांव यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या मराठा समाजासाठी बलिदान दिले आहे. तसेच हे बलिदान देऊन ही सरकारला त्यावेळी आपल्या मराठा समाजाची दयामया आली नव्हती मग आत्ता पण तिच परिस्थिती आहे.
प्रल्हाद पाटील ,विजयसिंह शिंदे ,अक्षय भोसले , यांनीही मराठा आरक्षणाबाबत मार्गदर्शन केले.
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी प्रत्येक गावा गावात बैठक आयोजित करायची असून आपल्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने आज चावरे गावामधे येवून पुढील दिशा ठरविण्यात असे यावेळी सांगितले .
या प्रसंगी पुंडलिक बिंरजे, हनुमंत पाटील ,रघुनाथ पाटील प्रवीण खोपकर ,गोरख शिंदे .,आसमान मोहिते बाळासाहेब पाटील, संतोष पाटील शिवाजी माने ,सुहास जाधव, प्रभाकर कुरणे ,संभाजी पाटील ,दिग्विजय पाटील ,ओंकार पाटील, किरण पाटील अनिरुद्ध पाटील ,महेश शिंदे, महादेव मोहिते ,पोपट पाटील भाऊसो मोहिते संग्राम पाटील, जयदीप पाटील, सागर जाधव ,नितीन पाटील, संजीत पाटील पृथ्वीराज पाटील, अक्षय माने, प्रथमेश पाटील ,सदाशिव मोरे ,रघुनाथ पाटील, सतीश पाटील इत्यादी मराठा बांधव उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment