• Home
  • टोमॅटोची प्रतिजाळीस ‘इतका’ भाव ; शेतमाल बाजार समितीत आणण्याचे सभापतीचे आवाहन

टोमॅटोची प्रतिजाळीस ‘इतका’ भाव ; शेतमाल बाजार समितीत आणण्याचे सभापतीचे आवाहन

टोमॅटोची प्रतिजाळीस ‘इतका’ भाव ; शेतमाल बाजार समितीत आणण्याचे सभापतीचे आवाहन

प्रतिनिधी= किरण अहिरराव

नाशिक / म्हसरूळ : शरदचंद्रजी मार्केट यार्डात गुरुवारी (ता. १०) झालेल्या लिलावात टोमॅटोच्या प्रतिजाळीस एक हजार पन्नास रुपये कमाल भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. लिलावप्रक्रिया पार पडल्यानंतर शेतकऱ्यास रोख स्वरूपात पैसे दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल आणावा, असे आवाहन सभापती देवीदास पिंगळे यांनी केले.

बाजार समितीत शेतमाल आणण्याचे सभापतींचे आवाहन
सद्यःस्थितीत बाजार समितीत निफाड, दोडी, संगमनेर व सिन्नरहून टोमॅटोची आवक होते. यात सर्वाधिक आवक सिन्नरहून होते. गुरुवारी (ता. ८) आवक ३४ हजार ६५० जाळ्या झाली असून, किमान भाव चारशे रुपये, तर कमाल भाव एक हजार पन्नास रुपये मिळाला.

सरासरी ७५० रुपये प्रतिजाळी भाव मिळाला आहे. पावसाची उघडझाप सुरू असल्याने टोमॅटो उत्पादनवाढ झाली असून, आवकही कमी-जास्त होते आहे

. > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

टोमॅटो मार्केटची सभापतींकडून पाहणी
पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केटयार्डातील टोमॅटो मार्केटला जागोजागी असलेला गाळ वाढला होता. टोमॅटोची आवक वाढल्याने शेतकरी वर्दळ वाढली आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या शेतकरीवर्गास लिलाव प्रक्रियेदरम्यान चिखल व गाळ काढून खडी व मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती युवराज कोठुळे यांच्यासह संचालक विश्वास नागरे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, विनायक माळेकर उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment