• Home
  • *मिरज शहरात देखील जणतेचा कर्फ्युला समिश्र प्रतिसाद*

*मिरज शहरात देखील जणतेचा कर्फ्युला समिश्र प्रतिसाद*

*मिरज शहरात देखील जणतेचा कर्फ्युला समिश्र प्रतिसाद*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूस मिरजकरांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आदीपासूनच विरोध दर्शविलेल्या व्यापारी संघटनांनी आज आपली दुकाने सुरू ठेवून जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनला कायम विरोध असल्याचे सिद्ध केले.
सकाळपासूनच शहरातील सराफ कट्टा, मिरज हायस्कूल रोड, स्टेशन चौक, दर्गा परिसर, तलाव रोड, छत्रपती शिवाजी चौक येथील दुकाने दिवसभर सुरू होती. तर भाजी बाजारात तुरळक गर्दी पाहायला मिळाली. तसेच हातगाडी चालकांनी उपनगरात फिरत भाजी विक्री केली. मिरजेतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अखेरपर्यंत तीन हजारहून अधिक रुग्णांची नोंद आहे तर 135 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
मात्र मिरजकरांना जनता कर्फ्यू नको आहे.
जिल्ह्याचे शासकीय कोविड रुग्ण असलेल्या मिरजेत सध्य परिस्थिती पाहता मिरज शहरांमध्ये 3237 रुग्णांची नोंद आहे तर 135 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मिरज तालुक्‍यातील ग्रामीण भागात 2050 रुग्ण असून 94 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढ होत असताना मात्र जनता कर्फ्यूस विरोध दर्शवला जात आहे. तसेच मिरज शहरातील व्यापाऱ्यांकडून एकमत होत नसल्यामुळे काही दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवली तर विरोधी गटाच्या व्यापाऱ्यांनी थोडीफार दुकाने बंद ठेवून समर्थन दर्शविले.
ग्रामीण भागातील बहुतांश गावांना जनता कर्फ्यूचे पालन केले. तर अनेक गावांनी विरोध दर्शविला. मात्र आज दिवसभर ग्रामीण भागातील शेतमाल शहरात आला नाही. तर शेतकरी नोकरदार वर्गाने शहराकडे पाठ फिरविल्यामुळे मार्केट परिसरात आणि शासकीय कार्यालयामध्ये सन्नाटा पसरला होता.

anews Banner

Leave A Comment