Home नांदेड कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ कुसुम महोत्सवाचा शानदार समारोप.

कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ कुसुम महोत्सवाचा शानदार समारोप.

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240306_070458.jpg

कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ कुसुम महोत्सवाचा शानदार समारोप.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून आयोजित कुसुम महोत्सवाचा शानदार समारोप सोहळा सायंकाळी अतिशय उत्साहात पार पडला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब,माजी मंत्री भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब,माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण,माजी आमदार अमरनाथ राजूरकर साहेब पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल मॅडम,सौ.मृणाल ताई राजूरकर,उपस्थित होते यात डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनीही सहभाग नोंदवत हजेरी लावली.
कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून मुंबई येथील प्रसाद महाडकर आणि त्यांच्या टिमने मागील तीन दिवसांपासून सादर केली. एकापेक्षा एक सरस अशा कलाविष्कारांना भरभरून प्रतिसाद नांदेडकरांनी दिला यावेळी कार्यक्रमास नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी ताई आंबूलगेकर,माजी महापौर मंगला ताई निमकर,माजी महापौर शैलजा ताई स्वामी,माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी साहेब,दैनिक सत्यप्रभाचे संपादक संतोषजी पांडागळे साहेब,विजय येवनकर,कामाजी पवार मोठ्या संख्येने नांदेडकर उपस्थित होते.

Previous articleअखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद कर्नाटकच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम व मराठी भाषिक कवी संमेलन संपन्न
Next articleनांदेड लोकसभा निवडणूक आढावा बैठक संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here