Home Breaking News संपादकीय अग्रलेख

संपादकीय अग्रलेख

136
0

*संपादकीय अग्रलेख..

वाल्या कोळी आणि आम्ही!!* *आज हा लेख लिहण्याचा उद्देश असा की,पौराणिक काळात एक वाल्या कोळी होता आणि तो आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करुन उदरनिर्वाह करण्यासाठी वाटमारी करायचा.जंगलाच्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला लुटायचा.हा त्याचा दिनकर्मच बनलेला होता.आणि जो सहजासहजी लुटमारीला बाधत नसे त्याला मग वाल्या कोळी यमसदनी धाडत असे.याप्रकारे वाल्या कोळीने सात रांजण खडयांनी भरले.म्हणजे एक व्यक्ती मारला की,राजणांत एक खडा टाकायचा,असे सात राजंण भरल्यानंतर वाल्या कोळीला एकदा नारद मुनी त्या रस्त्याने जाताना भेटले.वाल्या कोळीने त्याचेवर कुर्हाड उगारताच,नारद मुनी वाल्याला म्हणाले.मला जरुर मार!! पण तु हे सगळ ज्यांच्यासाठी करीत आहेस ते तरी तुझ्या या कृत्यात व पापात वाटेकरी आहेत का हे एकदा घरी जाऊन विचारुन ये.मग मला खुशाल मार! मी तुझी येथेच वाट बघत बसतो अस नारदमुनी वाल्या कोळीला बोलताच वाल्या धावत पळत घरी गेला.बायको पोरांना जवळ बोलावून त्याने विचारले की,मी जो धंदा तुमच्या सगळ्यांसाठी करीत आहे.त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का?त्यावर वाल्याला त्याच्या बायको मुलांनी उतर दिले की,तु जे कृत्य करीत आहे.त्याला तु एकटाच जबाबदार आहेस तुझा आमचा काहीच संबंध नाही.तेवढे ऐकून वाल्या अत्यंत हळूवार पाऊलांनी नारद मुनीजवळ आला.व घडलेली सगळी घटना नारदमुनीना सांगितली.आणि तेथूनच मग वाल्या कोळीने सर्वस्वाचा त्याग केला आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी म्हणून नावारूपास आला.हा झाला पौराणिक काळाचा इतिहास!!पण….आमचे काय?आम्हीदेखील वाल्या कोळीसारखेच आयुष्यभर धावाधाव करीत असतो.उपाशीतापाशी खस्ता खात फिरतो.मात्र आपल्याच माणसांना कधी दुःखाची झळही लागू देत नाहीत.त्यांच्या सुखासाठी वाट्टेल त्या उचापती करुन त्यांचेसमोर आपण सगळे विनासायास आणून टाकतो.मात्र त्याचे महत्त्व किंवा किंमत आपण ज्यांचेसाठी हे सगळं करतो नेमकी त्यांनाच राहत नाही.आपले ज्यांना हे समजतो की,हेच माझा जीव की प्राण आहेत नेमके तेच आपल्याशी अप्रामाणिक वागतात.आणि आपली त्यांना कशाचीही गरज नसते हे त्यांच्या बोलण्यातून व वागण्यातून ते अनेकदा आपल्याला दाखवून देतात.तरीही आपण मुर्खासारखे त्यांचेच गुणगाण गात राहतो हेच मुळी भ्रामक कल्पनाशक्तीचा फाटका पसारा आहे.आपण आपल्या आयुष्यातील बहुमूल्य असा वेळ काळ ज्यांच्यासाठी खर्च केलेला असतो.त्यांच्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून तळहातावर जीव घेऊन सर्वस्व अर्पण करायला एका पायावर तयार असतो.अखेर तेच आपली लायकी त्यांचेजवळ किती आहे हे दाखवून देतात.म्हणजे एकंदरीत आपण त्यांचेसाठी अक्षरशः वाल्या कोळीसारखे राबायचे आणि आपण त्यांचेकडे एखाद्या गोष्टीची अपेक्षा व्यक्त केली की मग त्यांनी आपल्याला आपली खरी लायकी व औकात दाखवून मोकळे व्हायचे,हिच या जमान्याची रित आहे.जो आपल्याशी या पध्दतीने वागतो किंवा तशी वागणूक देतो त्याच्याही जीवनात खरे तर तो कधीच सुखी समाधानी राहू शकत नाही.कारण त्याच्या पोटी आलेली औलादच त्याला एक दिवशी त्याची खरी किंमत काय ते दाखवून देत असतो.म्हणजे एका अर्थाने ज्या मुलाबाळासाठी वाल्या कोळीची भुमिका आई किंवा वडील पार पाडत असतात अखेर ते मुलदेखील एक दिवशी आपली आई किंवा वडीलांना तीच परिस्थिती आणतात.मुलांच्या नजरेत आई किंवा वडील फक्त पैसे कमावणारे ए.टी.एम.मशीन झालेले आहे.त्याचे दुष्परिणाम सुध्दा लवकरच बघायला मिळतील हे सत्यदेखील कोणी नाकारु शकत नाही.आपण ज्याचेशी जस वागलो तसच फळ आपल्याला देखील मिळणार आहे.हि निसर्गाचा नियमच आहे.परंतु त्याचा विचार कुणी करताना दिसत नाही.म्हणूनच तर आजच्या जमान्यातल्या वाल्या कोळीचा फक्त”युज अँण्ड थ्रो”च होत आहे.तशीच परिस्थिती आपलेच मुलबाळ आपल्यावरही आणतील याचे भान मात्र जरुर ठेवावे!!⏺राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युज चँनल*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here