• Home
  • देगलूर मधील बँकाचे ATM बनले कोरोना प्रसारक यंत्र तरी स्थानिक प्रशासनाने घेतली बघ्याची भुमिका*

देगलूर मधील बँकाचे ATM बनले कोरोना प्रसारक यंत्र तरी स्थानिक प्रशासनाने घेतली बघ्याची भुमिका*

*देगलूर मधील बँकाचे ATM बनले कोरोना प्रसारक यंत्र तरी स्थानिक प्रशासनाने घेतली बघ्याची भुमिका*
*नांदेड, राजेश एनभांगे*
देगलूर शहरात सद्याच्या लाॕकडावुन काळात सर्व काही सुरळीत असतानाच केवळ स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बँक व्यवस्थापनाने हलगर्जीपणा अंगीकारल्याने बँकांच्या ATM मशिन रूम मध्ये नागरिकांचे पैसे काढण्यासाठी रिघ लागली असुन ATM रूम मध्ये गर्दि जमल्याने या ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचे तीन तेरा वाजलेले दिसुन आले. तरी ATM मशिन द्वारे रोज घडीला शेकडो नागरिक एकमेकांच्या संपर्कात येत असलेले दिसत असुन सुद्धा बँक प्रशासनाला येथे सेनिटायझर नावाचे लिक्विड या ठिकाणी ठेवण्याचे सौजन्य वाटत नाही व ही बाब स्थानिक प्रशासनाच्या लक्षात सुद्धा आणुन देण्यात आली असली तरी त्यांनी *”कान असुन बहीरे व डोळे असुन अंधळे”* अशी भुमिका घेतल्याने परिस्थिती जैसेथेच आहे. तरी आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो कि ह्या ATM च्या ठिकाणी एखादा बाहेर राज्यातील किंवा जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्ण आल्यास इतर उपस्थित लोकांना सुद्धा कोरोनाची व्हायरसची बाधा होवु शकते ही गोष्ट नाकारता येत नाही कारण,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याच्या अद्यादेशाने परप्रातांतील व बाहेर जिल्ह्यात कामाला गेलेल्या नोकर वर्ग व मजुर आता मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनाने आपआपल्या गावी परतु लागले असल्याने अता स्थानिक प्रशासनाने पुर्वी पेक्षा जास्त सतर्कता बाळगण्याची गरज असुन त्याचाच एक भाग म्हणून बँकांच्या ATM रूम मध्ये होणारी गर्दी पाहता शहरातील सर्व बँकांनी तेथे सेनिटायझरची तात्काळ सुविधा द्यावी व सोशल डिस्टेंसिंगचे ही काटेकोर पालन करावे अशी सक्त सुचना (नोटिस) शहर प्रशासनाने बँक व्यवस्थापकांना घ्यावे अन्यथा अशा ठिकाणी एखाद्या कोरोना पाॕझेटिव्ह (मानवी बाँम्ब) येवुन जर कोरोना मुक्त देगलूर शहराला कोरोना बाधित केल्यास याला जबाबदारा कोण ? असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही त्या मुळे शहर प्रशासनाने बघ्याची भुमिका न घेता या बाबतीत तात्काळ कठोर पाऊले उचलावित व बँकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे नाहीतर देगलूरची परिस्थिती नांदेड सारखी झाल्याशिवाय राहणार नाही.

anews Banner

Leave A Comment