🚩🚩🚩🚩*युवा मराठा न्युज परिवाराचे एक पाऊल न्यायाच्या मागणीसाठी*
*संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आम्ही या पत्राव्दारे आवाहन करीत आहोत की,युवा मराठा वृतपत्र व न्युज चँनलने सतत समाजप्रबोधना बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे.अनेक सामाजिक प्रश्नांत लक्ष घालून ती सोडविली आहेत.त्यामुळेच युवा मराठा वृतपत्र व न्युज चँनलने आपली वाटचाल नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारसणीवर चालविली आहे.त्यामुळेच आज युवा मराठा परिवार अठरा पगड जातीधर्माच्या व बारा बलुतेदार समाजाच्या नागरिकांना सोबत घेऊन वाटचाल करीत आहे.तर महत्त्वाचा मुळ मुद्दा असा की,गेल्या अलिकडच्या काळात कोपर्डीच्या श्रध्दाताईचा गुन्हेगारांनी अनन्वीत अत्याचार करुन खुन केला.त्यानंतर हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जीवंत जाळून ठार मारण्यात आले.आणि अगदी काल परवा रक्षाबंधनाच्या दिवशी रायगड जवळच्या रोहा तालुक्यातील तांबडी गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचाही निर्घूणरित्या खुन करण्यात आला.हि पुरोगामी म्हणविणारे महाराष्ट्राला काळीमा ठरणारी घटना व कलंक लागलेला आहे,असे असतांनाही गुन्हेगारांना अद्याप पर्यत फाशीची शिक्षा झालेली नाही.त्यामुळेच महाराष्ट्रातील आया बहिणीची अब्रु धोक्यात आलेली आहे.वास्तविक कोपर्डीच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशातील मराठा समाज संघटीत झाला व मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपली शक्ती शासनाला दाखवून दिली.तरीदेखील शासनाला त्याचा काहीच फरक पडला नाही.किंवा गुन्हेगारांनी फाशीची शिक्षा झालेली नाही.तस बघितल तर गुन्हेगाराला जात नसते,आणि तो फक्त गुन्हा करण्याच्या वाईट बुध्दीतूनच समाजातील आया बहिणीना वेठीस धरुन त्यांचेवर अत्याचार करीत असतो.मात्र कायदे कितीही असले तरी निर्णयक्षमता व कर्तव्यकठोरता नसल्याने हे प्रकार राजरोस वाढीस लागत चालले आहेत.मी स्वतः मागील वर्षी कोपर्डीच्या श्रध्दांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांची मनस्थिती जवळून जाणून घेतली आहे की,आजही ते कुटूंब कशा आणि किती वाईट अवस्थेत जगत आहे.मात्र त्याचे गांभिर्य शासनाला नाही किंवा लोकप्रतिनिधीना नाही.*
*आणि म्हणूनच युवा मराठा न्युज परिवाराने घेतला निर्णय*
*आया बहिणीच्या अब्रुची सुरक्षिततेची हमी शासनाने घेतलीच पाहिजे.त्याशिवाय वरील तिघांही घटनामधील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.त्यासाठी शासनाने जलद गती न्यायालयात सदरचे प्रकरण सोपवून त्याचा तात्काळ निपटारा केलाच पाहिजे.आदी स्वरुपाच्या विविध मागण्या घेऊन मी स्वतः मालेगांव ते मुंबई मंत्रालय पर्यत सायकल यात्रेने प्रवास करणार आहे.या सायकल यात्रेत ज्यांना स्वइच्छेने सहभागी व्हायाचे असेल ते सहभागी होऊ शकतात व त्यासाठी संपर्क साधावा.*
*काय आहेत सायकलयात्रेचे उद्देश?*
*सायकल यात्रा हि मालेगांव पासून मुंबईकडे जाताना रस्त्यावरील प्रत्येक गावात जाऊन प्रबोधनात्मक व जनजागृतीपर मिटींग घेऊन.गावातील नागरिकांच्या सहयाचे निवेदन राज्यपाल मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या नावाचे घेऊन पुढील गावाकडे मार्गाक्रमण करेल.या प्रवासात प्रत्येक गावातून संकलित केलेले सर्व निवेदन हे मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना देण्यात येतील.व कठोर कायदा बनवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.तर मागील काळात घडलेल्या घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाणार आहे.हि सायकल यात्रा अत्यंत शांततेच्या मार्गाने प्रत्येक गावातून जाणार असून,ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन आमची भुमिका मांडली जाणार आहे.त्यासाठी प्रत्येक गावातील समाजबांधवानी येणाऱ्या सायकल यात्रेतील पदाधिकारी वर्गाची आपआपल्या गावात मुक्कामी असलेल्या ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करावी.त्याशिवाय हा एक सामाजिक स्वरुपाचा ज्वलंत प्रश्न असल्याने ज्या कुणाला या सायकल यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी तात्काळ मला संपर्क साधावा.*
*राजेंद्र पाटील राऊत*
*मुख्य संपादक युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड न्युज चँनल*
*भ्रमणध्वनी-9923362030/9850447685*
*विशेष सुचना-हे आंदोलन सामाजिक प्रश्नावर असून कुणीही या आंदोलनात राजकारण आणू नये आणि या सायकल यात्रेत राजकीय कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.🙏