*श्री हरी शैक्षणीक सांस्कृतिक व सामाजिक संस्था नामपुर आयोजित शिक्षक गुण गौरव समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा* सटाणा,(जगदिश बधान ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नामपूर ता सटाणा येथील जेष्ट नागरिक संघ कार्यालय नामपुर येथे लाडशाखिय वाणी समाजाचे अध्यक्ष मयूर अलई यांचे अध्यक्ष ते खाली व बागलांणचे आमदार दिलीप बोरसे यांचे उपस्थितित संपन्न झाला.शिक्षक पुरस्कारारथी म्हणून उन्नति प्रथमिक शाळेचे प्रमोद रघुनाथ येवले सर, प्रदीप गहिवरे सर शिरपुर, शशिकांत महालपुरे सर पाचोरा, डी बी मालपुरे सर चलिसगाव, पंकज दशपुते सर त्रयंबकेश्वर यांचा आदर्श शिक्षक म्हणुन संस्थेच्या वतीने दिमाखदार सोहळयात गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुनील भाऊ मुसळे नाशिक, प्रभाकर केदु बागड़ नाशिक, धनराज शिवाजी वाणी नाशिक, वासुदेव बधान नाशिक, तसेच आयोजक अध्यक्ष शरद हरि नेरकर सर पत्रकार नामपुर, गिरीष वाणी पारोला, प्रकाश मालपुरे सर धुळे, राजेंद्र दशपुते सर पिपळनेर, भटू प्रल्हाद वाणी महस्दी, निवृत्ति येवले सर भोकरदन आदि सह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
