• Home
  • आधी झाले तिरस्कार,मग मिळाले पुरस्कार अन आता होतायत सत्कार*

आधी झाले तिरस्कार,मग मिळाले पुरस्कार अन आता होतायत सत्कार*

*संपादकीय अग्रलेख*
*आधी झाले तिरस्कार,मग मिळाले पुरस्कार अन आता होतायत सत्कार*
*वाचकहो,*
आमचा जन्मच मुळात संघर्षमय वाटचालीतून झाला आहे.अनंत कष्ट केलेत.खस्ता खाल्ल्यात.पत्रकारितेच्या क्षेत्रात नावलौकिक व्हावा,म्हणून अहोरात्र मेहनत परिश्रम घेऊन झटत राहिलोत,आणि हे सगळ करत असताना आमचेच नातेवाईक म्हणविणारे आप्तस्वकीय हितचिंतक देखील आमच्याकडे अगदी तुच्छ तिरस्काराच्या भावनेने बघायचे,जस काही आम्ही फारच मोठा गुन्हा करुन जन्माला आलो आहोत.हाच काय तो आमचा दोष?वास्तविक आम्ही कुणाचे नातेवाईक आहोत किंवा सगेसंबधी आहोत हे सांगायची देखील ज्यांना लाज व शरम वाटायची त्याचे कारणही तसे मजेशीरच आहे,की आमच्याकडे स्वतः ची अशी संपती इस्टेट नसल्याकारणाने देखील आम्ही त्यांचे कुणी आहोत हे सांगायची देखील त्या आप्तस्वकीयांना सगेसंबधीना आमची लाज वाटायची.मात्र आज जमाना बदलला,लेखनीने आम्हांला घडविले,चारचौघात बसविले,विविध पातळ्यावर नावलौकिक मिळवता आला.म्हणूनच कालपर्यत तिरस्कार करणारे सगेसबंधी आप्तस्वकीय नातलग म्हणविणारे मतलबापुरते आमचा स्विकार करायला लागलेत.म्हणजे तेसुध्दा कामापुरता मामा!अर्थात युज अँण्ड थ्रो हि पध्दत अवलंबून आमचा कामापुरताच सल्ला घ्यायचा,मार्गदर्शन घ्यायचे.एरवी त्यांच्या तोंडावर जणू काही कुत्रे मुतून गेल्यासारखी अवस्था त्यांची आम्हांला बघितल्यावर होते.
असो,सत्याच्या वाटेवर चालताना फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार केला की कोण आमच्या वाईट काळात सोबत होते आणि कोण नव्हते हा विचार करण्यापेक्षा आम्ही कुणाच्या कामी आलो.आणि कुणाच्या सोबत आहोत याचा आम्हांला जास्त अभिमान आहे.ज्यांचे कधी हजारो रुपयांचे कामे आम्ही केवळ माणूसकीखातर करुन दिलीत.त्यांना कधी त्यांचे महत्व व गांभिर्य कळालेच नाही.जे कधी आपल्या सख्ख्यांचे झाले नाहीत.ते आमच्यासारख्या कफल्लक फकीर माणसाचे काय होतील?त्यांचेसाठी तर फक्त पैसाच सबकुछ…व भगवान झालेला आहे.जीवनात माणूस कधी कुणाशी दोन शब्द चांगले बोलून तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलत नसेल तर तो जन्मच व्यर्थ आहे.आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला आपण तरी सोबत काय घेऊन जाणार आहोत? याच आत्मपरिक्षण मात्र कधीच कुणी करताना दिसत नाही कवडी कवडी माया जोडी संग ना आया अधेला,चल उड जा हंस अकेला!हि आयुष्याची वस्तुस्थिती असतानाही माणस नेमकी कोणत्या अहंकारात व धुंदीत जगतात माणूसकी नावाचे गणित त्यांच्या हिशोबीही नसते.हिच मोठी शोकांतिका आहे.वास्तविक आम्ही आयुष्यात काय कमावले असा जर कुणी आम्हांला सवाल केलाच तर आम्ही फक्त आणि फक्त माणस कमावलीत,जीवाभावाची,माणूसकी जोपासणारी आणि शेवटी कालही कफल्लकच होतो आणि आजही रस्त्यावरचे फकीर आहोत आम्ही!संपूर्ण देशात कुठेही स्वतःच्या नावाने संपती जमविली नाही किंवा बँक बँलन्स नाही.फक्त माणस जोडून माणूसकी कमाविली.मात्र ज्यांना फक्त वेळेवरच आमची गरज पडते आणि नंतर त्यांच्या तोंडावर कुत्रे मुतल्यागत ते आमच्याशी वागतात यावरुन फक्त एका सुप्रसिध्द चित्रपटाच्या गाण्याच्या ओळी ओठावर येतात.”क्या मिलिये ऐसे लोगोसे,जिनकी फितरत छुपी रहे असली चेहरा छुपा रहे नकली चेहरा सामने आये” खरं तर तस बघितल्यावर साहजिकच एक लक्षात येत की,आप्तस्वकीय नातेवाईक सगेसंबधी म्हणविणारे म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हज को असेच म्हणावे लागेल.ज्यांना आपल्याच सख्ख्या सासू सास-याची आयुष्यभर लाज वाटली.शेवटी मतलबासाठी त्यांचे तळवे चाटत फिरले.अशा कृतघ्न मतलबी लोकांना अखेर जीवनाचं मर्म ते काय कळणार?आमचा लहानपणापासून ज्यांनी ज्यांनी तिरस्कार केला,तेच आज आमचा होत असलेला सत्कार व मिळत असलेला इमानदारी प्रामाणिकतेचा पुरस्कार बघून जळून राख होत आहेत.शेवटी हेच त्यांच्या अंगी असलेले संस्कार त्यांना कवडीशुन्य म्हणूनच नावारुपास आणत आहेत.यापेक्षा जास्त तरी काय लिहावे? एक मात्र खरे की,आमचे वागणे म्हणजे निर्भिड,सडेतोड खरेला खरे व खोटयाला खोटे बोलण्याचे धाडस.एकंदरीत राष्ट्रसंत जगदगुरु तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगावयाचे झाले तर “भले तरी देऊ गांडीची लंगोठी,नाठाळाचे माथी हाणू काठी”हेच आमचं वागणं,व सत्याचा स्विकार करुन लबाडांना ठोकर हे आमच ध्येय!. एवढेच यानिमिताने..

anews Banner

Leave A Comment