*नाशिक*
विष्णू अहिरे नाशिक विभागीय संपादक युवा मराठा न्यूज़ नेटवर्क)
गेल्या 4 दिवसापासून गंगापुर धरण पाणलोट शेत्रात सततधार चालू असल्यामूळे नाशिकला पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरण 81 टक्के भरल्याने नाशिकरांना दिलासा मिळाला मात्र गंगापूर धरणं समूहात अजून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे कारण गेल्या वर्षी च्या तुलनेत पुरेसा पाऊस अजुन पडलेला नाही, गेल्या आठवड्यात पाणी कपातीचे संकेत देण्यात आले आहेत म्हणून अजुन ही पाऊस पडणे गरजेचे आहे, धरण 100 % भरणे हे नासिककरा साठी अति महत्वाचे आहे, वरुन राजा कोसळेल अशी आशा करु या
-इगतपुरी परिसरात संततधार पाऊस सुरूच असल्याने दारणा धरणातून विसर्ग वाढवला
-दारणा धरणातून 11हजार 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू
-दारणा नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा।।।।।
