Home Breaking News *इवलासा वेलू लावला व्दारी* *त्याने घेतली उंच गगनभरारी!!*

*इवलासा वेलू लावला व्दारी* *त्याने घेतली उंच गगनभरारी!!*

124
0

*इवलासा वेलू लावला व्दारी*
*त्याने घेतली उंच गगनभरारी!!*
*मायबाप,*
*वाचक,दर्शक,प्रेक्षकहो आज आपल्या अपार प्रेमापोटीच आणि आपण दाखविलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टलचे पन्नास हजार वाचक जोडू शकलो.५०,००० हजार वाचक निर्माण करणे हि साधीसोपी गोष्ट नाही.मे २०२० च्या १७ तारखेला आम्ही वेब पोर्टलची स्थापना केली आणि बघता बघता अवघ्या चार महिने पुर्ण होण्यापुर्वीच पन्नास हजार वाचकसंख्येचा टप्पा आम्ही पार पाडला.यासाठी आपल्या आवडी निवडीच्या बातम्या प्रसारीत करण्यावर आमच्या महाराष्ट्र भरातील पत्रकार बंधूनी मोलाचे योगदान दिलेले आहे.हे विशेष कौतुकास्पद आहे.कुठल्याही न्युज चँनलचे प्रथम कर्तव्य असते ते म्हणजे निरपेक्ष वृतीने बातम्या प्रसारीत करणे. त्यासाठी कुठल्या एका विशिष्ट पक्षाची भाटगिरी करुन किंवा अतिरंजीत बातम्या प्रसारीत करुन आपला नावलौकिक वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न कधीच युवा मराठा न्युजने केला नाही,संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य करतांना युवा मराठा न्युजने सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी! हे ब्रीदवाक्य सोबत घेण्याबरोबरच कुणावर अन्याय होईल किंवा नाहक कुणी सोशल मिडीयाच्या बातमीचा शिकार होईल असे कृत्य कधीच केले नाही,त्याउलट बातमी प्रसारीत करण्यापुर्वी बातमीची दुसरी बाजूही तितक्याच सक्षमतेने तपासून पाहिली.व त्याला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.युवा मराठा न्युजच्या माध्यमातून आम्ही अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गिगांवचा रस्ता प्रश्न सोडविला.मालेगांवच्या श्रीरामनगरातील खड्डा कायमचा बंद करुन सुस्थितीत करण्यात आला.हे केवळ युवा मराठा न्युजच्या बातमीमुळेच घडू शकले.त्याशिवाय नाशिकच्या अधिकाऱ्यांची आई रस्त्यावर मागते भीक हा रोखठोक प्रश्न प्रखरतेने मांडून त्या आईला हक्काचे मुलाचे घर मिळवून देण्याचा व्यशस्वी प्रयत्न युवा मराठा न्युजने केला.त्याशिवाय आज १३आँगस्ट.बरोबर एक वर्षापुर्वी म्हणजेच १३आँक्टोबर २०१९ रोजी युवा मराठा न्युजच्या टिमने आजच्याच दिवशी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात असलेल्या ब्रम्हनाळ या गावात प्रत्यक्ष जाऊन पुरग्रस्त बांधवाना सुमारे दोन लाख रुपयांची मदत अन्नधान्य व कपडयांच्या स्वरुपात देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासली.फक्त आणि फक्त सवंग लोकप्रियता मिळविण्याचा युवा मराठा न्युजने कधीच प्रयत्न केला नाही.त्याउलट प्रसिध्दीसाठी हपापलेल्या पत्रकारानाही मालेगांवच्या तत्कालीन तहसिलदार ज्योती देवरे प्रकरणात त्यांची खरी लायकी दाखवून दिली.व सत्याच्या पाठीशी खंबीरपणे युवा मराठा उभा राहिला,आज युवा मराठा न्युजने वेब पोर्टलचे पन्नास हजार वाचक जोडलेत.यासाठी मोलाचे योगदान आमच्या पत्रकार बांधवाचे आहे,तसेच मायबाप वाचक,प्रेक्षक,दर्शकांचे आहे.आपल्या अपार प्रेमापोटीच आमचा उत्साह व्दिगुनीत होतो आणि आम्ही आणखी वेगवेगळ्या संकल्पना आपल्यासमोर आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करतो,युवा मराठा न्युजचे लवकरच कौळाणे(निं) येथे राजे सयाजीराव महारांजाच्या भुमीत स्वतः चे अद्ययावत कार्यालय सुरुवात होत आहे.त्यासाठी आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असाच राहू द्यावा हिच अपेक्षा बाळगतो,आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो.आपले आभार शब्दात व्यक्त होण्यासारखे नाहीतच.तरीही आम्ही आपल्या ऋणातच राहणे अधिक पसंत करतो.*
*🙏धन्यवाद🙏*
*राजेंद्र पाटील राऊत*
*मुख्य संपादक*
*युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र*

Previous article*कोरोना योद्धा एक आदर्श* *व्यक्तीमत्व*
Next articleराज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here