Home Breaking News राज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर –

राज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर –

88
0

राज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दिल्ली, दि. १३ – उत्कृष्ट तपास केल्याबद्दल यंदा देशातील १२१ पोलीस अधिकारी केंद्रीय गृहमंत्री पदकाचे मानकरी ठरले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या दहा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या पदकांची घोषणा करण्यात आली.

या पोलीस अधिकाºयांमध्ये सीबीआयचे १५ जण, मध्यप्रदेश व महाराष्ट्राचे प्रत्येकी दहा पोलीस अधिकारी, उत्तर प्रदेशमधील आठ, केरळ व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ पोलीस अधिकारी आहेत. बाकी पोलीस अधिकारी अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत. गृहमंत्री पदक जाहीर झालेल्यांमध्ये २१ महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री पदक ९६ पोलीस अधिकाºयांना जाहीर झाले होते. त्यामध्ये १३ महिला पोलीस अधिकाºयांचा समावेश होता. गुन्ह्यांचा तपास तत्परतेने व अतिशय कौशल्याने केला जावा व उत्कृष्ट तपास करणाºया अधिकाºयांना गौरविण्यात यावे, या उद्देशाने २०१८ सालापासून केंद्रीय गृहमंत्री
पदक देण्यास प्रारंभ झाला. त्यावर्षी १०१ पोलीस अधिकाºयांना या पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

यंदाचे महाराष्ट्रातील दहा मानकरी
(१) सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, (२) पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकाडे, (३) पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे, (४) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, (५) पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, (६) पोलीस उपअधीक्षक अनिल घेर्डीकर, (७) पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, (८) सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, (९) सहायक पोलीस आयुक्त किसान गवळी, (१०) पोलीस निरीक्षक कोंडिराम पोपरे.

Previous article*इवलासा वेलू लावला व्दारी* *त्याने घेतली उंच गगनभरारी!!*
Next article🛑 कोकणात गणपती स्पेशल ट्रेन चालवायला रेल्वे तयार…….! राज्य सरकारच्या होकारची प्रतीक्षा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here