• Home
  • पुणे परवीधर रणधुमाळी

पुणे परवीधर रणधुमाळी

पुणे परवीधर रणधुमाळी

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे. प्रामुख्याने भाजपचे संग्राम देशमुख, अपक्ष उमेदवार नीता ढमाले, शरद पाटील व महाआघाडीचे अरुण लाड यांच्यात काटे की टक्कर होत आहे.
आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. यानिमित्ताने अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) मतदान होत आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.पूर्वी ही निवडणूक कधी होत होती हे सामान्यांना कळतही नव्हते. पण यावेळी सार्वत्रिक निवडणुकीसारखी चुरस निर्माण झाली आहे.
पदवीधरसाठी 62 तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार मैदानात आहेत. ‘पदवीधर’मध्ये भाजपचे संग्राम देशमुख,अपक्ष उमेदवार नीता ढमाले,प्रा.शरद पाटील व महाआघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे.
संग्राम देशमुख यांना पक्षाचा मोठा पाठिंबा मिळाला आहे तर नीता ढमाले यांना पदवीधर मतदारांचा व लाड यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मंत्री जयंत पाटील तसेच महाआघाडीतील काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ताकद दिली आहे.
ही लढत चौरंगी होत असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
प्रचारासाठी नीता ढमाले या आघाडीवर आहेत. जाहीर सभा, कार्यकर्ता मेळाव्यांपासून ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी या नेत्यांची धावपळ सुरू आहे. नेत्यांच्या बैठका घेऊन प्रचाराच्या सूचना दिल्या जात आहेत. जादा मतदान असलेली गावे आणि शहरांवर विशेष नजर ठेवून कार्यकर्त्यांद्वारे मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रमुख व स्थानिक नेत्यांनीही प्रचाराच्या रणधुमाळीत सक्रिय सहभाग घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
याचबरोबर जनता दलातर्फे माजी आमदार शरद पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, ‘आप’चे डॉ. अमोल पवार यांनीही जोरात प्रचार चालविला आहे.
अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांनी प्रचाराचा धडाका उठवला आहे. सोशल मीडियावर तर प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार, याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार – संग्राम देशमुख (भाजप महायुती), नीता ढमाले(अपक्ष), अरुण लाड ( महाविकास आघाडी), प्रा.शरद पाटील (जनता दल), श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक),
पुणे शिक्षक मतदारसंघात 35 जण रिंगणात – मावळते आमदार दत्तात्रय सावंत पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने जयंत आसगावकर, भाजपने जितेंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडीने सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment