Home Breaking News 🛑 हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात ‘हि’ लक्षणं…..! दुर्लक्ष करणं ठरु...

🛑 हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात ‘हि’ लक्षणं…..! दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं 🛑

68
0

🛑 हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात ‘हि’ लक्षणं…..! दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं 🛑
✍️ आरोग्य 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

आरोग्य विषयक :⭕ हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढले आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही हार्ट अटॅक आलेला दिसत आहे. त्यामुळे सर्वांनीच हार्ट अटॅक विषयी माहिती जाऊन घेऊन त्यापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक बनले आहे. हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही संकेत येऊ लागतात. हे कोणते संकेत आहेत जाणून घ्या.

कोणताही अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येत असतो. काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात. चालताना छाती खूप जास्त जड झाल्यासारखी वाटते.

त्याला एंजायना पेन असे देखील म्हणतात. छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे. अचानक श्वास घ्यायला त्रास होतो, चालताना, जिने चढताना-उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही बिलकूल दुर्लक्ष करु नका.
अनेकवेळा घश्यात जळजळ सुद्धा होत असते. काहीही खाताना जळजळीचा सामना करावा लागतो. काहीही खाल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. तसेच काहीही खाल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणं, छातीत जळजळ यामुळे हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्भवतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे विकनेस, थकवा खूप जाणवतो. या लक्षणांव्यतिरिक्त काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे चालताना ही समस्या वाढते. जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खोकला कफची समस्या असेल आणि हाता-पायांना सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

काही जणांना कोणतेही शारीरिक श्रमाचे काम न करता घाम येण्याची समस्या जाणवते. महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅक येण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. मादक पदार्थांचे सेवन, लठ्ठपणा, आनुवांशिकता ही कारणं हार्ट अटॅकची असू शकतात. अशी लक्षणं दिसत असल्यास वेळीच तज्ज्ञांशी संपर्क करून तपासणी करून त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करुन घ्या….⭕

Previous article🛑 हडपसर येथील मगरपट्टा येथे….! सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला अटक 🛑
Next article१५ आॅगस्टला सातारा जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here