• Home
  • गुगुळवाड ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसाधारण महिलेच्या जागेवर आदिवासी महिलेस सरपंच पदाची संधी!

गुगुळवाड ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसाधारण महिलेच्या जागेवर आदिवासी महिलेस सरपंच पदाची संधी!

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210216-WA0041.jpg

गुगुळवाड ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसाधारण महिलेच्या जागेवर आदिवासी महिलेस सरपंच पदाची संधी!
आर डी निकम यांचे सोशल इंजीनियरिंग उपसरपंच पद घेण्यास विनम्रपणे नकार,सर्वसाधारण जागेवर एसटी महिला सरपंच करण्याचा हा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग,
मालेगांव,(सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- गुगुळवाड येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत च्या चुरशीच्या निवडणुकीत आर.डी.निकम यांच्या नेतृत्वाखालील,गुगुळवाड विकास आघाडीने सात पैकी पाच जागा पटकावून निर्विवाद बहुमत मिळविले होते, आर.डी.निकम यांनी स्वतःच्या वार्डात समोरील दोन्ही उमेदवारांच्या उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त केल्या होत्या, निकम यांच्यासह सुपाबाई तलवारे, रोशनी निकम, सुनील निकम व नीलम महाले हे पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले,
निवडणुकीपूर्वीच आर.डी.निकम यांना सरपंच पदाचे उमेदवार म्हणून आघाडीच्या सर्व नेत्यांनी जाहीर केले होते, तथापि सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले, पॅनल मधून दोन सर्वसाधारण महिला, व एक एसटी राखीव महिला निवडून आल्या होत्या, दोन्हीं सर्वसाधारण महिलांनी सरपंच पदावर दावा केल्याने पॅनलच्या नेत्यांसमोर बिकट प्रसंग निर्माण झाला होता,म्हणून पॅनलच्या प्रमुखांनी दोन्ही सर्वसाधारण महिलांना बाजूला करत एसटी भिल्ल समाजाच्या महिलेला सरपंचपदाचा मान दिला, तसेच युवा सेनेचे प्रमुख सुनील निकम या तरुणास उपसरपंच पदाचा मान दिला, आर डी निकम यांनी उपसरपंच व्हावे म्हणून सर्वांनी गळ घातली होती,तथापि पॅनलची निर्मिती करतानाच उपसरपंच पदाचे नाव निश्चित झाल्याने आर.डी.निकम यांनी उपसरपंचपद घेण्यास विनम्रपणे नकार दिला.
गेल्या अनेक पिढ्या गुगुळवाड ची शेती भिल्ल समाजाच्या जिवावर अवलंबून असून, निकम परिवारावर त्यांची प्रचंड निष्ठा असल्याने, त्यांच्या उपकाराची फेड म्हणून निकम परिवाराने सर्वांनी मिळून सर्वसाधारण महिलेची जागा असताना, एका एसटी महिलेस सरपंच पदाचा मान देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे,
गुगुळवाड येथे गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना असून 15 ते 20 दिवस गावाला प्यायला पाणी मिळत नाही, तसेच काही शेतकऱ्यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून शिवार रस्ते बंद करून ठेवलेले आहेत, मेळवण धरणाचा प्रश्न गेल्या पंचवीस-तीस वर्षापासून प्रलंबित आहे,तसेच रेशन कार्ड साठी आदिवासी बांधवांकडून चार ते पाच हजार रुपये काही लोकांनी गोळा केलेले आहेत,हे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याची साठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील, असे पॅनलचे प्रमुख आर.डी.निकम यांनी सांगितले,
काल शांततेत पार पडलेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीनंतर, गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकीसाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी गावात एकच जल्लोष केला, ढोल ताशा व गुलालाची उधळण करत, गावात जोरदार मिरवणूक काढण्यात आली, नवनिर्वाचित सदस्यांचे महिलांनी गावभर औक्षण केले,
निवडणूक यशस्वी करण्यासाठी, वाल्मीक निकम,विजूआप्पा निकम, भालचंद्र निकम,सोनु बाबा, बापु बर्वे, विश्वास निकम, शांताराम निकम, शरद बर्वे, दिनेश बर्वे, संतोष निकम, भाऊसाहेब निकम,प्रकाश निकम, आप्पा अहिरे, किशोर अहिरे, भूषण निकम, संकेत निकम, नितीन महाले, जीवन माळी, समाधान निकम, दादा सोनवणे, कृष्णा निकम, राजेंद्र निकम,अशोक निकम, गोरख निकम, अशोक निकम, पप्पू खैरनार, राजेंद्र बर्वे, गोलु निकम रवींद्र निकम, संदीप निकम, राकेश निकम, विश्वास पवार, नितीन निकम, निंबा धवडे, निंबा निकम, दिपक निकम, नानाभाऊ निकम, बापू निकम, सचिन निकम, दत्तू निकम, नानाभाऊ निकम, ज्ञानेश्वर निकम, कैलास ढवडे,अशोक ढवडे रमेश तलवारे आदींनी परिश्रम केले.

anews Banner

Leave A Comment