• Home
  • १५ आॅगस्टला सातारा जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू 🛑

१५ आॅगस्टला सातारा जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू 🛑

🛑 १५ आॅगस्टला सातारा जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधुन सर्वत्र मिठाईचे, खासकरुन जिलेबीचे वाटप केले जाते.

या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होवुन, सार्वजनिक आरोग्य धेक्यात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवुन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून जिल्हादंडाधिकारी, शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास दि.१५ ऑगस्ट रोजी 00.00 वा. पासून ते २४.00 वा. पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ प्राप्त असलेल्या अधिकारानुसार मनाई केली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment