Home सोलापूर 10 नोव्हेंबरला मतदार यादी पुनरीक्षणासाठी ग्रामसभेचे आयोजन

10 नोव्हेंबरला मतदार यादी पुनरीक्षणासाठी ग्रामसभेचे आयोजन

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20221109-WA0007.jpg

10 नोव्हेंबरला मतदार यादी पुनरीक्षणासाठी ग्रामसभेचे आयोजन

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

भारत निवडणूक आयोग यांच्याकडून प्रत्येकवर्षी विशेष संक्षिप्त पूनरीक्षण कार्यक्रम घेऊन अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करून त्रुटी विरहित करण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक एक जानेवारी 2023 या अहता दिनांकवर छायाचित्रासह जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये मतदार यादीच्या विशेष सक्षित पुनरीक्षण कार्यक्रमांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली
ग्रामसभेत अस्तित्वात असलेले मतदार यादी गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी/ तपासण्यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेली असून या यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार यादी मध्ये नोंदी तपासून घ्याव्यात. गावातील मतदार यादीमध्ये नोंदणी झालेल्या मतदारांच्या नोंदणीचे प्रमाणिकरण करण्याची कार्यवाही सुरू असल्याने मतदारांनी त्यांच्या आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी सलग करण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संबंधित बीएलओ यांच्याकडे घ्यावेत. मतदार यादी मधील नोंदणीबाबत हरकती,नोंदी मध्ये दुरुस्ती व नवीन नाव नोंदणी करावयाची सुविधा ग्रामसभेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ग्रामसभेमध्ये मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरित मतदारांची वगळणी, लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे तसेच एक जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहेत यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी, ज्यांचे 1 ऑक्टोंबर, 2023 पर्यंत18 पूर्ण होणार आहेत, त्यांच्याकडून नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, 10 नोव्हेंबर 20 22 रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये उत्सुकतापणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी सर्व नागरिकांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here