• Home
  • *राधानगरी धरणाच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ.*

*राधानगरी धरणाच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ.*

*राधानगरी धरणाच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ.*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने राधानगरी धरणात झपाट्याने वाढ झाली आहे.
पाण्याची पातळी ४५ फुटापर्यंत आली असुन धरनभरण्यासाठी २-५ फुटाची गरज आहे.काल दिवसभरात तिन फुटाची वाढ झाली आहे.
नदीकाठच्या गावानां सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे.
कोल्हापुरातील राधानगरीत शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी धरण बांधलं. पण आजही ते भक्कमपणे उभा आहे.कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण. बरोबर 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराची तहान ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर या धरणाची निर्मिती केली. देशात कोणत्याही धरणाला स्वयंचलीत दरवाजांची सुविधा नसेल असं तंत्र इथं वापरण्यात आलं. तब्बल 7 टी.एम.सी क्षमता असलेल्या धरणाच्या या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत. या धरणाचं बांधकाम हे दगडांमध्ये करण्यात आलंय. या विशिष्ट बांधकाम प्रकारावरुनच या धरणाचं बांधकाम किती भक्कम आहे याची प्रचिती येते. चुना आणि शिसे यांचं मिश्रण करुन या धरणाची बांधणी केली. ती इतकी भक्कम आहे की 100 वर्षानंतरही धरण डामडौलात उभं आहे.

anews Banner

Leave A Comment