• Home
  • संघर्ष व स्वाभिमानाचा धगधगता निखारा;श्रीमती आशाताई बच्छाव

संघर्ष व स्वाभिमानाचा धगधगता निखारा;श्रीमती आशाताई बच्छाव

*संघर्ष व स्वाभिमानाचा धगधगता निखारा;श्रीमती आशाताई बच्छाव*
*काही व्यक्तीचा स्वभावच मुळात हा मायाळू,प्रेमळ,परोपकाराची जाणीव करुन घेण्यासाठीच असतो.मग अशा व्यक्तीना स्वतः ची प्रसिद्धी कधीच करावी लागत नाही.ते आपल्या कार्यकर्तृत्वाने आपोआपच प्रसिध्दीच्या यशोशिखरावर पोहचतात.आज १२जुन”युवा मराठा”न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक-महिला पत्रकार श्रीमती आशाताई बच्छाव यांचा वाढदिवस.त्यानिमित त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा लेखाजोखा मांडण्यासाठीचा लेखनप्रपंच!!*
*लेखक -राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युज चँनल*………………………………..
फुलाला ज्याप्रमाणे आपल्या सुगंधाची जाहिरात कधीच करावी लागत नाही त्याचा सुवासच त्यांच्या फुल असल्याची जाणीव आपल्या दरवळपणामुळे सगळीकडे करुन देतो.अगदी त्याचप्रमाणे महिला पत्रकार श्रीमती आशाताई बच्छाव यांच्या कार्याची जाणीव त्यांच्या कार्यकर्तृत्वातून व त्यांनी केलेल्या प्रखर संघर्षातूनच दिसून येते.१२जुन १९७६ या दिवशी त्यांचा नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या व-हाणेसारख्या छोटयाशा खेडेगांवात स्वर्गिय दादाजी रतन शेवाळे व दमयंताबाई शेवाळे या दाम्पत्यांच्या उदरी जन्म झाला.माणूस जन्माला आल्यावर तो त्याच्या नावाने नव्हे तर कर्तबगारीमुळे नावलौकीकास पात्र होतो.श्रीमती आशाताई बच्छाव यांचे शिक्षणाविषयी बघितलेले स्वप्न हे अपुर्णच राहिले.जेमतेम गावात शिक्षण घेऊन,शिक्षणाला रामराम ठोकावा लागला.आणि अल्पवयातच त्यांना विवाहबंधनाच्या जोखडात बंदीस्त व्हावे लागले.डोळ्यात उतुंग स्वप्न व स्वाभिमानी सुसंस्कारी जीवन जगण्याची असलेली उमेद हिच त्यांच्या प्रगतीच्या वाटेवरील मोलाचा परिसस्पर्श ठरली.स्वतः चा नवरा अशिक्षित असतानाही त्याचा संसार अत्यंत प्रभावी व खंबीरपणाने नावारुपास आणला.मुळातच संघर्ष शिवाय मार्ग नाही हे आशाताईना त्रिवार सत्य माहित असल्या कारणानेच त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा हा कधीच सोडला नाही.काही तरी करुन दाखविण्याची जिद्द हेच त्यांच्या अभूतपुर्व यशाचे मर्मभेदक सत्य आहे,सन २००५ साली आशाताईनी पत्रकारितेत प्रथम पाऊल ठेवले आणि मग कधी मागे वळूनच बघितले नाही.एका खेडेगावातील मुलगी पत्रकारितेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीकास पात्र ठरली.”युवा मराठा”वृतपत्र आणि न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक पदाची व्यशस्वी जबाबदारी त्या पार पाडीत आहेत.चँनलच्या अत्याधुनिक सुधारणा व वेगवेगळ्या पध्दतीने चँनलचे नाव कायम उज्वल राखण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचे व प्रभावशाली ठरत आहे.श्रीमती आशाताई बच्छाव या गेल्या १५ वर्षापासून “युवा मराठा” वृतपत्रांच्या संपादकीय मंडळावर कार्यरत असल्याने त्यांचे मिळणारे प्रोत्साहन,मार्गदर्शन ,व खबीर साथ हि अत्यंत उपयुक्तच ठरली आहे.वाईट काळात व संकटात जे आपल्या सोबत नसतात तेच आपल्या आनंदात सगळ्यात पुढे होऊन नाचायला असतात,या गोष्टीचा आशाताईना पावलोपावली अनुभव आलेला असल्याने व त्यांनी कमी वयातच जीवन जगण्यासाठी केलेला संघर्ष व दुनियादारीतील खरे खोटयाची ओळख हि अगदी जवळून अनुभवलेली आहे.त्यामुळेच त्यांना लवकर दुनियेतील चांगले -वाईट अनुभव अनुभवयास मिळाले.आशाताईना आज संपूर्ण
महाराष्ट्रातील नागरिक त्यांच्या सामाजिक कार्यामुळे जवळून परिचीत झाले आहेत.श्रीमती आशाताईचे सामाजिक कार्यातील योगदान अत्यंत मोलाचे असून,त्यांनी कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मालेगांव शहरातून काढलेल्या मदतफेरीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन पुरग्रस्तांसाठी मदत संकलित केली.त्याशिवाय स्वतःच्या गावावर व-हाणे येथे दरवर्षी न चुकता निराधार गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन सामाजिक कार्याचा आदर्श जोपासला.त्याशिवाय संत गाडगे महाराज यांच्या वचनाप्रमाणे भुकेल्यांना अन्न व पाणी हे उपलब्ध व्हावे,म्हणून त्यांनी गावात स्वखर्चाने ग्रामपंचायतीची जागा स्वच्छ करुन पाणपोईसारखी सुविधा उपलब्ध करून दिली,तर अनेक निराधार बेसहारा महिलांना शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला.त्याशिवाय कुठल्याही अन्यायग्रस्त महिलेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कसबही आशाताईच्या अंगी भिनलेले आहेत.ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात मराठा समाज संघटीत झाला.एकत्रीत आला,त्या कोपर्डीच्या श्रध्दाताई सुद्रिक यांच्या कोपर्डी येथील घरीही महिला पत्रकार श्रीमती आशाताई बच्छाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कुटूंबियांना धीर व हिंमत देण्याचेच काम केले.श्रीमती आशाताई बच्छाव यांनी आजपर्यंत राज्यस्तरीय वृतपत्र सत्यवार्ता,कोल्हापुर विशेष,पोलिस नजर सारख्या वृतपत्रांतही व्यशस्वीरित्या कामगिरी पार पाडलेली आहे.आज त्या “युवा मराठा”न्युजपेपर्स अँन्ड न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक व भागीदार पदावर कार्यरत आहेत.आशाताईचा यथोचीत सन्मान व सत्कार विविध संस्थाकडून वेळोवेळी झालेला आहे,मालेगांवच्या तत्कालीन तहसिलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले,तर भिकारसोंडा सारख्या आदिवासी गावात त्यांचा सत्कार करुन सन्मानीत करण्यात आले.महिला पोलिस निरीक्षक प्रिया थोरात यांनीही श्रीमती आशाताईच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानीत केले आहे.आज आशाताई बच्छाव या आंतरराष्ट्रीय हुयूमन राईटस,राष्ट्रीय मराठा पार्टी,पोलिसमित्र अशा विविध पदावर कार्यरत आहेत.त्यामुळेच एका छोटयाशा खेडेगावात जन्मलेल्या आशाताई बच्छाव या संघर्ष व स्वाभिमानाच्या जोरावर जिद्द,हिंमत,आत्मविश्वास बाळगूनच आज संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीकास पात्र ठरलेल्या आहेत.आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित “युवा मराठा”न्युज चँनल परिवाराकडून लाखमोलाच्या अनमोल शुभेच्छा बहाल करण्याबरोबरच त्यांच्या भावी वाटचालीस,त्यांच्या दिर्घायु आरोग्यमय वाटचालीसाठी मनपुर्वक खुप खुप शुभकामना!!

anews Banner

Leave A Comment