• Home
  • देशात १५ जून पासून पुन्हा कडक लँकडाऊन? केंद्राचा खुलासा !

देशात १५ जून पासून पुन्हा कडक लँकडाऊन? केंद्राचा खुलासा !

🛑 देशात १५ जून पासून पुन्हा कडक लँकडाऊन? केंद्राचा खुलासा ! 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जेव्हा देशात ५०० रुग्ण सापडले होते, तेव्हा लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता अडीज महिन्यांच्या काळात हा लॉकडाऊन जवळपास संपूर्ण उठविण्यात आला आहे. मात्र, देशातील रुग्णांचा आकडा तीन लाखांकडे वाटचाल करत असताना पुन्हा येत्या 15 जूनपासून देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज फिरत होते.

यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. 15 जूनपासून देशभरात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल मिडीयावर फिरू लागले होते. या मेसेजमध्ये केलेल्या दाव्य़ानुसार 15 जूनपासून देशभरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसेच गृह मंत्रालयानेही लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
रेल्वे सेवेसह विमान सेवाही बंद करण्यात येणार असल्याचे यामध्ये म्हटले होते.

सरकारची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ने व्हायरल होत असलेला हा मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. पीआयबीमे फॅक्ट चेक ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार गृह मंत्रालयाकडून ट्रेन आणि विमानांवर बंदीसह देशभरात 15 जूनपासून लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यता आहे.⭕

anews Banner

Leave A Comment